घोटी :इगतपुरी तालुक्यात गेल्या दोन मिहन्यापूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत चुकीच्या आरक्षण धोरणामुळे काही ग्रामपंचायतीत अनेक जागा रिक्त राहिल्या. त्यात धारगाव, सोमज व नांदगांवसदो या तीन ग्रामपंचायतीत कोरमही पूर्ण होत नाही इतक्या जागा रिक्त राहिल्या. त्यामुळे कोरमअभावी या तीनही ग्रामपंचायतीत नविनर्वाचित सदस्यांची पिहली बैठक अद्याप झालीच नाही. याबाबत प्रशासनापुढेही पेच निर्माण झाला आहे. या तीनही ग्रामपंचायतीत थेट सरपंचपदाच्याही निवडणुका झाल्या.मात्र सदस्य संख्या निम्यापेक्षाही कमी असल्याने ग्रामपंचायत कायद्यानुसार रचना अपूर्ण असल्याने नविनर्वाचित सदस्यांच्या हाती अद्याप कारभार दिला नाही,नविनर्वाचित सदस्यांची पिहली बैठकच कोरम अभावी न झाल्याने कायदेशीर पेच निर्माण झाला आहे. पंचायत समिति प्रशासनाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे याबाबत मार्गदर्शन मागितले. जिल्हाधिकारी कार्यालयही हतबल ठरल्याने त्यांनीही निवडणूक आयोगाकडे मार्गदर्शन मागितले आहे. गेल्या दोन मिहन्यापूर्वी मुदत संपलेल्या इगतपुरी तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या सार्वित्रक निवडणुका झाल्या.त्यात धारगाव, सोमज व नांदगांव सदो ग्रामपंचायतीत निम्यापेक्षाही कमी जागाही रिक्त राहिल्याने नविनर्वाचित सदस्य मंडळाच्या हाती कारभार सोपविन्यबाबत कायदेशीर पेच निर्माण झाला आहे. या तीनही ग्रामपंचायतीत रचना अपूर्ण राहिल्याने नविनर्वाचित सदस्य मंडळाची पिहली सभा झालेली नाही अथवा घेता आली नाही याबाबत तहसील व पंचायत समिति प्रशासनाने याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे याबाबत मार्गदर्शन मागितले आहे.पेच गंभीर असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयानेही राज्य निवडणूक आयोगाकडे याबाबत मार्गदर्शन मागितले आहे. त्यामुळे निवडणूक आयोग याबाबत काय निर्णय देते ? याकडे या तीन ग्रामपंचायतीसह संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.निवडणूक आयोग सरपंचासह नविनर्वाचित सदस्यांच्या हाती गावचा कारभार सोपविनार की ग्रामपंचायतीत सदस्य कोरम पूर्ण होईपर्यंत प्रशासकीय राजवट स्थापित करणार? याकडे तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.--------------------------------------विशेष: -- धारगाव ग्रामपंचायत एकूण सदस्य संख्या -९ निवडून आलेले सदस्य -३ रिक्त जागा-६--------------------------सोमज ग्रामपंचायत --एकूण सदस्य संख्या -७ निवडून आलेले सदस्य -३ रिक्त जागा-४------------------------- नांदगांव सदो ग्रामपंचायतएकूण सदस्य संख्या -११ निवडून आलेले सदस्य -४ रिक्त जागा- ७
तीन ग्रामपंचायतींचा कारभार कोणाच्या हाती सोपवावा?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2018 3:42 PM
घोटी :इगतपुरी तालुक्यात गेल्या दोन मिहन्यापूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत चुकीच्या आरक्षण धोरणामुळे काही ग्रामपंचायतीत अनेक जागा रिक्त राहिल्या. त्यात धारगाव, सोमज व नांदगांवसदो या तीन ग्रामपंचायतीत कोरमही पूर्ण होत नाही इतक्या जागा रिक्त राहिल्या. त्यामुळे कोरमअभावी या तीनही ग्रामपंचायतीत नविनर्वाचित सदस्यांची पिहली बैठक अद्याप झालीच नाही. याबाबत प्रशासनापुढेही पेच निर्माण झाला आहे.
ठळक मुद्दे इगतपुरी तालुक्यात प्रशासनापुढे पेच : जिल्हाधिकारी कार्यालयाने मागितले निवडणूक आयोगाचे मार्गदर्शन