शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
5
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
6
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
7
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
8
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
9
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
10
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
11
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

‘घर का भेदी’चे सुरक्षा यंत्रणांपुढे आव्हान...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2020 9:31 PM

नाशिक : शहर व परिसरात कार्यरत असलेल्या अतिमहत्वाच्या संवेदनशील शासकीय आस्थापनांची शत्रू राष्ट्राच्या गुप्तहेरांमार्फत तसेच दहशतवादी संघटनाकडून रेकी अथवा तेथे चालणाऱ्या कामकाजाची माहिती घेण्याचा चोरटा प्रयत्न होत असतो. नुकत्यात एचएएल सारख्या महत्वाच्या कारखान्यात एका सहाय्यक पर्यवेक्षकाला पाकिस्तानच्या आयएसआय साठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली दहशतवादविरोधी पथकाने ताब्यात घेतले आहे. यामुळे संवेदनशील शासकीय आस्थापनांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. या शासकीय आस्थापनांची सुरक्षाव्यवस्था सांभाळणाºया यंत्रणांपुढे आता यापुढे ‘घर का भेदी’चेदेखील आव्हान राहणार असल्याचे यावरून स्पष्ट होते.

ठळक मुद्देशहरात सैन्य दलाची विविध केंद्रे : ठेवावा लागणार सूक्ष्म वॉच

नाशिक : शहर व परिसरात कार्यरत असलेल्या अतिमहत्वाच्या संवेदनशील शासकीय आस्थापनांची शत्रू राष्ट्राच्या गुप्तहेरांमार्फत तसेच दहशतवादी संघटनाकडून रेकी अथवा तेथे चालणाऱ्या कामकाजाची माहिती घेण्याचा चोरटा प्रयत्न होत असतो. नुकत्यात एचएएल सारख्या महत्वाच्या कारखान्यात एका सहाय्यक पर्यवेक्षकाला पाकिस्तानच्या आयएसआय साठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली दहशतवादविरोधी पथकाने ताब्यात घेतले आहे. यामुळे संवेदनशील शासकीय आस्थापनांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. या शासकीय आस्थापनांची सुरक्षाव्यवस्था सांभाळणाºया यंत्रणांपुढे आता यापुढे ‘घर का भेदी’चेदेखील आव्हान राहणार असल्याचे यावरून स्पष्ट होते.भारतीय संरक्षण खात्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची व संवेदनशील केंद्रे नाशिक शहर व परिसरात कार्यरत आहेत. यामध्ये आशिया खंडातील सर्वात मोठे नाशिक रोडचे भारतीय तोफखाना केंद्र, (आर्टिलरी सेंटर) तसेच देवळाली कॅम्प येथील स्कूल आॅफ आर्टिलरी, गांधीनगरचे कॉम्बट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कूल (कॅट्स), त्र्यंबकरोडवरील महाराष्ट्र पोलीस अकादमी, चलार्थपत्र मुद्रणालय, मुद्रांक शुल्क विभाग, एचएएल कारखाना, ओझर येथील भारतीय वायुसेनेचे ११ बेस्ट रिपेअर डेपो (बीआरडी), देवळाली येथील भारतीय वायुसेना केंद्र अशी विविध महत्त्वाची व भारतीय संरक्षण खात्याशी संबंधीत केंद्रे शहरात आहेत. यामुळे शत्रूच्या रडावर नेहमीच नाशिक राहत आले आहे. आठवडाभरपूर्वीच देवळाली आर्टिलरी स्कूलच्या परिसरात मूळ बिहारचा रहिवासी असलेल्या संजीव कुमार याला फोटोग्राफी करताना जवानांनी ताब्यात घेतले होते. त्याच्या मोबाईलची पडताळणी केली असता त्यानेही सोशलमीडियाद्वारे पाकिस्तानच्या एक व्हाट्सएपच्या ग्रुपमध्ये छायाचित्र पाठविल्याचे समोर आले आहे. त्याला न्यायालयाने पुन्हा येत्या १३ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकारचा तपास गती धरत नाही तोच पुन्हा एचएएलसारख्या नामांकित व भारतीय संरक्षणात महत्वाचे योगदान देणाºया कारखान्यातून चक्क एका हेराला एटीएसच्या पथकाने ताब्यात घेतले.घर का भेदी लंका ढायें...आयएसआय च्या हनी ट्रॅपमध्ये अडकलेला हेर दुसरा तिसरा कोणी नसून मागील दहा-बारा वर्षांपासून एचएएलमध्ये कार्यरत असलेला दीपक शिरसाठ नावाचा कर्मचारी असल्याचे समोर आले आहे. त्याने मागील सहा महिन्यांत पाकची गुप्तहेर संस्था आयएसआय च्या एका विदेशी हस्तकाला येथील भारतीय विमानांची माहिती, प्रतिबंधित क्षेत्राचे फोटो पुरविल्याचे प्रथमदर्शनी तपासात पुढे आले आहे. यामुळे एचएएल ला मोठा हादरा बसला आहे. घर का भेदी लंका ढायें.. या हिंदी म्हणीप्रमाणे एचएएल चा कर्मचारी असलेल्या या दीपकने एका हनी ट्रॅप मध्ये अडकून आपल्या देशाच्या संरक्षणासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या विमानांची माहिती पुरवून विश्वासाघात केल्याचे बोलले जात आहे.लालबाबा ने सुद्धा केली होती रेकीसातपूर परिसरातून यापूर्वी लालबाबा उर्फ बिलाल नावाच्या दहशतवाद्याला एटीएसने ताब्यात घेतले होते. तेव्हा त्याच्या चौकशीत महाराष्ट्र पोलीस अकादमीसह अन्य सर्व महत्वाच्या अस्थापनांची रेकी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. तसेच आर्टिलरी सेंटरमध्ये जॉन मॅथ्यूज नावाच्या जवानाने काही वर्षांपूर्वी आत्महत्या केली होती. यावेळी जॉनचे स्टिंग आॅपरेशन करण्यात आले होते आणि एक महिला कॅमेरामन थेट संवेदनशील भागात चित्रीकरण करण्यासाठी पोहोचल्याची बाब समोर आली होती. तसेच मुंबईच्या एक इसमालासुध्दा यापूर्वी लष्करी हद्दीत फोटोग्राफी करताना ताब्यात घेण्यात आले होते.

 

टॅग्स :IndiaभारतCrime Newsगुन्हेगारी