नाशिक - मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. नाशिकमधील सभेत सर्वप्रथम मनसेने केलेल्या 5 वर्षातील विकासकामांचा व्हीडिओ दाखवून राज यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. त्यानंतर, मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्यावर टीका केली. जलसंपदामंत्री याच जिल्ह्यातले आहेत ना, मग आजही महाराष्ट्र पाण्यासाठी वणवण भिरतोय. फडणवीस एक लाख वीस हजार विहिरी बांधल्याचं सांगतायेत, मग पाणी कुठंय, असाही प्रश्न राज यांनी विचारला.
जलसंपदा विभागातील 70 हजार कोटींच्या घोटाळ्याचे काय झालं ? देवेंद्र फडणवीस तुम्ही गप्प का?. अजित पवार आणि सुनिल तटकरेंवर कारवाई का नाही केली. जलसिंचन विभागातील घोटाळ्याचं पुढे काय झालं ? असे म्हणत राज यांनी मुख्यमंत्र्यांना टार्गेट केले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यभरात 'लाव रे तो व्हिडिओ' म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आश्वासनांची पोलखोल करणाऱ्या सभांचा धडाका लावला आहे. आजही नाशिकमधील सभेत राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी आणि भाजपावर टीका केली. नाशिकमधील महिलांची पाण्यासाठी होत असलेली वणवण राज यांनी आज आपल्या व्हीडिओतून दाखवली.
राज यांच्या भाषणातील मुद्दे
नरेंद्र मोदी यांनी देशात, देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात भूलथापा मारल्या.नाशिकच्या त्रंबकेश्वर येथील बर्डेवाडी येथील तळ गाठलेल्या विहिरीत महिला दोरखंडाने उतरताना व्हिडीओ दाखवून फडणवीस यांनी खोदलेल्या विहिरी गेल्या तरी कोठे.साडे चार वर्षांपूर्वीचे 70 हजार कोटी रुपये गेले कोठे? भाजपा सरकार देखावा किती करणार? जनतेला लक्षात आले आहे. हे आता तुम्ही लक्षात घ्या.भाजपा शिवसेना सरकारने राज्यात जलसंधारणची कामे कोठे अन कशी केली ? कांदा उत्पादक शेतकरी वर्गाला हमीभाव मिळवून देण्याचे आश्वासन देणारे मोदी यांचे भाषण दाखविले अन फेकू चौकीदारच्या घोषणा सुरू