नाशिक : आगामी सार्वत्रिक निवडणुका शिवसेनेबरोबरच लढविण्याची भाषा करणाऱ्या भाजपाला आत्ताच युतीचा पुळका का आला, पाच वर्षांत असे काय घडले की, आता शिवसेनेबरोबर येण्याची इच्छा झाली ते आधी भाजपाने जाहीर करावे, असे मत शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले.धुळे येथे प्रचारासाठी गेलेल्या राऊत यांनी नाशिकमध्ये पत्रकारांशी चर्चा केली त्यावेळी त्यांनी भाजपाच्या सेनाप्रेमाविषयी शंका उपस्थित केली.२०१४ मध्ये शिवसेनेची जी भूमिका होती तीच आजही कायम आहे. हिंदुत्व किंवा अन्य कोणतेही मुद्दे बदललेले नाही असे असताना त्यावेळी शिवसेनेने प्रयत्न करूनही युती झाली नाही; मात्र आता भाजपाचे नेते युती होणार असल्याचे सांगत आहेत ते कशाच्या आधारे? असा प्रश्न खासदार राऊत यांनी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याने अशाप्रकारच्या चर्चा होत असतील तर त्या करू नये, फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यांच्या उपस्थित होणाºया कार्यक्रमाला हजर राहणे हे महाराष्टÑाच्या परंपरेला धरून आहे. शरद पवार जरी उपस्थित झाले तरी शिवसेना हीच भूमिका घेते असे सांगून राऊत यांनी शिवसेनेच्या राष्टÑीय कार्यकारिणीत स्वबळावर निवडणुका लढविण्याचा निर्णय झाला असून, तसे उद्धव ठाकरे यांनी घोषित केल्याने युतीचा प्रश्नच उद््भवत नसल्याचे ते म्हणाले.सार्वत्रिक निवडणुकांची तयारी शिवसेनेने सुरू केली असून, येत्या जानेवारी महिन्यात उद्धव ठाकरे यांची नाशिक आणि पंढरपूर येथे सभा होणार असल्याचे ते म्हणाले.महाजन हे अंनिसच्या केससाठी फिटच्मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात सर्व समस्या अडचणी सोडविण्यासाठी दैवी शक्ती असल्याचा दावा करणाºया गिरीश महाजन यांच्यावर सामनातून टीका करण्यात आली. त्याचे समर्थन करताना महाराष्टÑात अंधश्रद्धा निर्मूलन कायदा आहे आणि अंनिससारख्या संस्थांनी प्रयत्न केले तर त्यात महाजन यांची केस फिट बसते, असे सांगितले. दुसरीकडे केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांना भोवळ आल्याने त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून फिट राहण्याच्या टिप्स घ्याव्या, अशी कोपरखळी मारली.अंगरक्षकांच्या उपस्थितीत पाहणी ही भीतीचच्राज्यातील दुष्काळी स्थितीची पाहणी करण्यासाठी आणि शेतकºयांच्या समस्या जाणवून घेण्यासाठी आलेल्या केंद्र सरकारच्या पथकांना झेड प्लस सुरक्षा पुरविण्यात आली असून, त्याबद्दल खासदार राऊत यांनी आश्चर्य व्यक्त केले. शेतकºयांच्या संतापाची भाजपाला भीती वाटत असल्याचे ते म्हणाले.
आत्ताच भाजपाला युतीचा पुळका का आला?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2018 12:46 AM
आगामी सार्वत्रिक निवडणुका शिवसेनेबरोबरच लढविण्याची भाषा करणाऱ्या भाजपाला आत्ताच युतीचा पुळका का आला, पाच वर्षांत असे काय घडले की, आता शिवसेनेबरोबर येण्याची इच्छा झाली ते आधी भाजपाने जाहीर करावे, असे मत शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले.
ठळक मुद्देसंजय राऊत यांचा सवाल बळाचा निर्णय अंतिमच असल्याचा दावा