शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

नाशिक महापालिकेला अचानक मराठी बाणा का सुचला ?

By संजय पाठक | Published: February 12, 2021 1:45 PM

नाशिक-  खरे तर चांगल्या कामाला कोणत्याही आदेशाची गरज नसते.मात्र तरीही कारण नसताना अचानक कोणी कायद्याला धरून चांगली कृती केली तरी त्यामुळे आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. शहरातील दुकानदारांना मराठीतच फलक लावण्यासाठी नाशिक महापालिकेने अचा्नक नेाटीसा बजावण्यास सुरूवात केली आणि त्यामळेच महापालिकेला अचानक झालेल्या मराठी बाणा हा विषय असाच शंका निर्माण करणारा ठरला आहे.

ठळक मुद्देदुकानांवर फलक लावण्याची सक्तीकारवाईचे अधिकार नाही मग आदेशाचा उत्साह कशाला?

संजय पाठक, नाशिक-  खरे तर चांगल्या कामाला कोणत्याही आदेशाची गरज नसते.मात्र तरीही कारण नसताना अचानक कोणी कायद्याला धरून चांगली कृती केली तरी त्यामुळे आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. शहरातील दुकानदारांना मराठीतच फलक लावण्यासाठी नाशिक महापालिकेने अचा्नक नेाटीसा बजावण्यास सुरूवात केली आणि त्यामुळेच महापालिकेचा अचानक जागृत झालेला मराठा बाणा हा विषय असाच शंका निर्माण करणारा ठरला आहे.

दुकाने आस्थाापना मंजुरीचे अधिकार तसे कामगार उपायुक्तांना आणि मराठी फलकाबाबतही त्यांचेच कायदेशीर दायीत्व असताना महापालिकेने अचानक मराठीचा बाणा दाखवण्यामागचे कारण काय असा प्रश्न त्यामुळेच निर्माण झाला आहे.

मराठीचे संवर्धन महाराष्ट्रातील शासकीय कार्यालयांनी करायचे नाही तर कोणी करायचे असा प्रश्न सहज कोणीही विचारू शकतो. मात्र, मराठी हा केवळ भाषा, साहित्य, स्वाभीमान आणि मातृभाषेचाच विषय आहे असे नाही तर तो राजकारणाचादेखील विषय आहे. मराठी हा एकेकाळी शिवसेनेचा मुद्दा होता तो नंतर क्षीण झाल्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हाती घेतला आणि त्यामाध्यमातून त्यांना राजकारणात यश देखील आले हे खरे असले तरी हा मुद्दाच राजकीयपटलावर कायम चालत नाही. निवडणूका आल्या की मग त्याची चर्चा सुरू होते आणि मग मराठीचा रक्षणकर्ता आपणच असे दावे केले जातात. राज्यात सध्याशिवसेनेची सत्ता आहे. त्यातच नाशिकमध्ये महापालिकेने अचानक दुकानांवर मराठी पाट्या लावण्याची सक्ती करणा-या नोटीसा पाठवल्याने दुकानदारबुचकळ्यात पडले. मुळात कोरोना संकट आत्ताशी कुठे कमी होत आहे. त्यातून सारेच व्यावसायिक सावरत असले तरी आर्थिक संकट मात्र टळलेले नाही.दुकानदारांना घरपट्टीसारख्या करात सवलत मिळावी यासाठी मागणी होत असताना त्याकडे दुर्लक्ष करून मराठी पाट्या  लावण्यासाठी आग्रह धरण्यामागचे कारणच कळू शकले नाही. समजा कोणी दुकानदाराने पाटी मराठीत लावली नाही तर त्यासाठी महापालिकेकडे कारवाई करण्याचे कोणते कायदेशीर अधिकार आहे असा प्रश्न केला तर कोणते  अधिकार नाही असेच उत्तर आहे. मग महापालिकेचा उत्साह अचानक कसा काय वाढला पुन्हा हाच प्रश्न निर्माण होत आहे.

नाशिक महापालिकेचे उत्पन्न सध्या घटले आहे. चारशे कोटींचा एकुण फटका बसल्याचे सांगितले जात आहे. कोरोनामुळे करदात्यांना थकबाकी वसुलीची सक्ती करता येत नाही. म्हणून सवलत योजना राबविली जाते इथपर्यंत ठीक आहे. परंतू घरपट्टी आणि पाणी पट्टीची देयके वेळेत दिली गेली नाही. त्यासाठी अपुरे मनुष्यबळाचे कारण प्रशासन पुढे करीत आहे. मग मराठी पाट्या बसवा अशा नोटीसा बजावण्यासाठी मनुष्यबळ कोठुन आले, हा एक प्रश्नच आहे.

खरे तर मराठीची सक्ती करणा-या महापालिकेचा मराठीतील  कारभार कसा चालतो याचे साधे उदाहरण द्यायचे तर मध्यंतरी ज्येष्ठ साहित्यीक बाबुराव बागुल यांचा स्मृती जपण्यासाठी  उड्डाण पुलावर लावलेला  देखील शुध्द मराठीत नव्हता. काही संस्थांनी याबाबत  तक्रार केल्यानंतर महापालिकेला चूक सुधारावी लागली. इतकेच नव्हे तर चार वर्षांपूर्वी नाशिक महापालिकेकडून बांधकाम पूर्णत्वाचा दाखला म्हणजेच कंप्लीशन सर्टिफिकेट मराठीत दिले जात होते तेऑटोडीसीआर आल्यापासून इंग्रजीत दिले जाऊ लागले, त्याचे काय? महापालिकेच्या विविध कामांच्या निविदा वृत्तपत्रातून देताना सोयीच्या काही निवीदा इंग्रजीत आणि काहीमराठीत दिल्या जातात, तेव्हा महापालिकेचा मराठी बाणा कोठे जातो, ते कळत नाही. मग आत्ता मराठी पाट्यांच्या सक्तीचा सोस कोठून आला. अगदी फारच  मराठी प्रेम असेल तर महापालिकेच्या मराठी शाळा जगवल्या तरी खूप झाले. परंतु त्याकडे दुर्लक्ष करून नाशिकमध्ये भरणाऱ्या  मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने अशाप्रकारे बेगडी मराठी प्रेम दाखवून काय होणार?

अलिकडे प्रशासन कायद्यापेक्षा राजकारणाचा विचार अधिक करीत असेल तर हरकत नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आयुक्तांचे कौतुक केले आहेच, आताराज्यात शिव सेनेचे शासन असल्याने  शिवसेनेनेही आयुक्तांचा गौरव करावा. मराठी साहित्य  संमेलनाच्या निमित्ताने नाशिक मधील दुकानांच्या पाट्या मराठीत झाल्याचं तर त्या बद्दल देखील महापालिकेचा गौरव व्हावा म्हणजे खूप झालं. 

टॅग्स :NashikनाशिकNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाShiv SenaशिवसेनाMNSमनसेmarathiमराठी