शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआत फूट? शेतकरी कामगार पक्षाने जाहीर केले ५ उमेदवार; जयंत पाटलांनी केली घोषणा
2
शिंदे समर्थक अपक्ष आमदार शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार, भाजपाला दिला होता पराभवाचा धक्का
3
महाराष्ट्रात मविआत तणाव, तिकडे झारखंडमध्ये इंडिया आघाडीत फूट, हा पक्ष पडला बाहेर, उमेदवारही केले जाहीर
4
न्यायाधीश अन् कोर्ट सगळंच खोटं; गुजरातमधील १०० एकर सरकारी जमीन बळकावली
5
सचिन वाझेला हायकोर्टाकडून जामीन मंजूर; पण तरीही तुरुंगातच राहणार, कारण...
6
मोठा निष्काळजीपणा! ड्रायव्हर झाला डॉक्टर; इमर्जन्सी वॉर्डमध्ये रुग्णांना दिली औषधं, इंजेक्शन
7
Google कर्मचाऱ्यांना मोफत भोजन का पुरवते? सीईओ सुंदर पिचाई यांनी सांगितलं नेमकं कारण
8
"महाविकास आघाडी फुटणार"; शिवसेना नेत्याचा मोठा दावा, म्हणाले, " २४ तासांत उद्धव ठाकरे..."
9
जुन्नरमध्ये पुन्हा मोठा ट्विस्ट: शेरकरांच्या एंट्रीला तुतारीच्या पदाधिकाऱ्यांचा विरोध; उमेदवारीच्या स्पर्धेत २ निष्ठावंत आघाडीवर!
10
यमुना एक्सप्रेस वेवरून जात होती कार, पोलिसांना आला संशय, तपाणसी केली असता सापडला सोन्याचा खजिना
11
प्रियंका चोप्राने अन्नू कपूर यांना किस करण्यास दिलेला नकार; म्हणाले, "माझ्याकडे चांगला चेहरा नाही..."
12
"देवेंद्र फडणवीसांनी फार हुशारीने..."; पृथ्वीराज चव्हाणांचा आरोप, मोदींनाही सवाल
13
"ही चूक हरयाणात झालीये, महाराष्ट्रातही होतेय", पृथ्वीराज चव्हाणांनी ठेवलं मुद्द्यावर बोट
14
"दिल्लीत गुन्हेगारी वाढतेय, लोकांच्या मनात भीती असते की..."; आप नेत्याचा भाजपावर निशाणा
15
"बंटेंगे तो कटेंगे", मुंबईत योगींचे फोटो असलेले बॅनर्स; काय म्हणाले मुख्तार अब्बास नकवी?
16
चीनच्या जीडीपी एवढे झाले गोल्डचे मार्केट कॅप, 5 वर्षात व्हॅल्यू डबल; चेक करा देशातील सोन्या-चांदीचा लेटेस्ट दर
17
डॅशिंग IAS अधिकारी! वयाच्या ५७व्या वर्षी प्रेमविवाह; आता मंदिरांवरील लाऊडस्पीकरवर 'सवाल'
18
धर्मासाठी सिनेइंडस्ट्रीला केला रामराम, ३ हिट सिनेमात केलं होतं काम, सध्या काय करतेय २४ वर्षीय अभिनेत्री?
19
भाजपातील गटबाजीला कंटाळले, राष्ट्रवादीत गेले, तिथेही दिला राजीनामा; आता ठाकरेंकडे चालले
20
अजित पवार गट विधानसभेच्या किती जागा लढवणार? अजितदादा म्हणाले... 

मायबाप रसिकांपुढे कशाला पसरावा ‘पसा’?

By admin | Published: November 23, 2015 10:40 PM

सार्वजनिक वाचनालय : परशुराम साईखेडकर नाट्यगृहातील नियोजित ‘पे अ‍ॅण्ड पार्क’वरून रंगकर्मींसह रसिकांत नाराजी

नाशिक : सार्वजनिक वाचनालयाच्या परशुराम साईखेडकर नाट्यगृहातील नियोजित ‘पे अ‍ॅण्ड पार्क’वरून रंगकर्मींसह सर्वसामान्य रसिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. नाट्यगृहात कार्यक्रमाला येणाऱ्या रसिकांना पार्किंगचा भुर्दंड कशासाठी, असा सवालही उपस्थित केला जात आहे. सार्वजनिक वाचनालयाचे परशुराम साईखेडकर नाट्यगृह हे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असून, तेथे अव्याहत कार्यक्रम सुरू असतात. या नाट्यगृहाच्या दुरुस्ती व रंगरंगोटीचे काम गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. हा खर्च वसूल करण्यासाठी नाट्यगृहाच्या आवारात ‘पे अ‍ॅण्ड पार्क’चा घाट घालण्यात आल्याची चर्चा आहे. नाट्यगृहात येणाऱ्या रसिकांकडून दुचाकी वाहनासाठी पाच, तर चारचाकी वाहनासाठी दहा रुपये शुल्क वसूल केले जाणार आहे. याबाबत सार्वजनिक वाचनालयाचा निर्णय झाला असून, नाट्यगृहात सुरू असलेली राज्य नाट्य स्पर्धा संपल्यानंतर त्याची अंमलबजावणी केली जाणार असल्याचे या स्पर्धेच्या उद्घाटनाच्या वेळी सांगण्यात आले. त्यामुळे पुढच्या महिन्यापासून नाट्यगृहात येणाऱ्या सर्वसामान्य रसिकांना पार्किंगचा भुर्दंड सोसावा लागण्याची चिन्हे आहेत. नेमक्या याच काळात सांस्कृतिक संचालनालयाच्या वतीने या नाट्यगृहातच बालनाट्य व संस्कृत नाट्य स्पर्धा रंगणार आहेत. परशुराम साईखेडकर नाट्यगृहातील बहुतांश कार्यक्रम सर्वांसाठी मोफत असतात. आयोजक नाट्यगृहाचे रीतसर भाडे भरून तेथे कार्यक्रम आयोजित करतात. आता मात्र सावानाने ‘पे अ‍ॅण्ड पार्क’ची अंमलबजावणी केल्यास कार्यक्रम मोफत असूनही रसिकांना पार्किंगचे शुल्क मात्र भरावे लागणार आहे. नाट्यगृहाच्या खर्च वसुलीसाठी सामान्य रसिकांसमोर ‘पसा’ पसरण्याची गरजच काय, असा प्रश्न विचारला जात आहे. तसेच याबाबत काही पर्यायही सुचवले जात आहेत. (प्रतिनिधी)