शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
2
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
3
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
4
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
5
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
6
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
8
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
9
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
10
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
11
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
12
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
13
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
14
IPL मेगा लिलावासाठी परफेक्ट ऑडिशन; Marcus Stoinis नं पाक गोलंदाजांना धु धु धुतलं!
15
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
16
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
17
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
18
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
19
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
20
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेलपाटे मारावे लागतील”: संजय राऊत

पारंपरिक शाहीमार्गाचे रुंदीकरण बारगळणार

By admin | Published: December 17, 2014 12:29 AM

पर्यायी मार्ग : मुख्यमंत्र्यांकडे लोकप्रतिनिधींचा रेटा

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यात पर्वणीकाळासाठी काट्या मारुती चौक ते गणेशवाडी व्हाया गौरी पटांगण असा पर्यायी मार्ग सोमवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत लोकप्रतिनिधींनी सुचविल्याने परंपरागत शाहीमार्गाच्या रुंदीकरणाचा प्रस्ताव जवळपास बारगळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. साधू-महंतांनी परंपरागत शाहीमार्गाचाच आग्रह कायम ठेवला असला तरी मागील सिंहस्थात झालेली दुर्घटना लक्षात घेता प्रशासनाला उचित सहकार्य करण्याचीही भूमिका घेतली आहे. मागील सिंहस्थ कुंभमेळ्यात परंपरागत शाहीमार्गावरील सरदारचौकातील उतारावर शाही मिरवणुकीच्या वेळी चेंगराचेंगरीची घटना होऊन ३२ भाविकांचे बळी गेले होते. त्यानंतर गेल्या अकरा वर्षांत परंपरागत शाहीमार्गाच्या रुंदीकरणाचा विषय वारंवार चर्चेत राहत आला आहे. दुर्घटनेनंतर शासनाने नेमलेल्या रमणी आयोगानेही रस्ता रुंदीकरणाची शिफारस केली तर पोलीस प्रशासनानेही रुंदीकरणाची सूचना महापालिका व जिल्हा प्रशासनाला केली. त्यानुसार आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर परंपरागत शाहीमार्गाचा रुंदीकरणाचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून भूसंपादनाकरिता अंदाजित निवाडा होऊन महापालिकेकडे २५ कोटी ५२ लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार परंपरागत शाहीमार्ग ९, १२ आणि १५ मीटर रुंद विकास योजना राबविण्यासाठी महापालिकेच्या स्थायी समितीने पहिला हप्ता म्हणून ८ कोटी ४१ लाख रुपयांना मंजुरी देत त्यातील ५ कोटी रुपये जिल्हाधिकारी कार्यालयाला अदाही केले आहेत.