शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
2
"शिवसेनेत बसलेल्या सासूमध्ये प्रॉब्लेम"; शेवटच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
3
मणिपूरबाबत केंद्राचा मोठा निर्णय; सीएपीएफच्या ५० तुकड्या पाठविणार
4
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
5
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
6
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
7
ईडी-सीबीआयच्या दबावाखाली पक्ष बदलला नाही - कैलाश गेहलोत
8
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
9
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
10
₹२२० प्रीमिअमवर पोहोचला 'हा' IPO, लिस्टिंगवर होऊ शकतो ९८ टक्क्यांचा नफा; कधी करता येईल गुंतवणूक?
11
Maharashtra Vidhan Sabha 2024: सर्वांत तरुण उमेदवार कोणत्या पक्षाचे?
12
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!
13
भाजपा नेत्यांच्या या दहा घोषणांनी बदलली प्रचाराची दिशा, निकालात ठरू शकतात निर्णायक
14
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
15
"काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात सोयाबीनला केवळ ३,८०० रुपयांचा भाव’’; भाजपा खासदाराने दाखवला आरसा
16
एक Home Loan घेतल्यानंतर दुसरं होम लोन घेता येतं का? जाणून घ्या काय आहे दुसऱ्या लोनची प्रोसस
17
कैलाश गेहलोत भाजपमध्ये सामील, दिल्ली निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवालांना मोठा झटका
18
Gold Silver Rates Today : लग्नसराईच्या काळात सोन्या-चांदीच्या किंतीत मोठा बदल, स्वस्त झालं की महाग? पटापट चेक करा 14 ते 24 कॅरेट सोन्याचा लेटेस्ट रेट
19
विदेशी वित्तसंस्थांच्या विक्रीचा मारा थांबणार कधी? अमेरिकेची बेरोजगारी, जपानच्या चलनवाढीकडे लक्ष
20
Maharashtra Election 2024 Live Updates: आमच्या सरकारने जे सांगितले गेले ते केले आणि जे सांगितले गेले नाही तेही केले. - जे पी नड्डा

रस्ते अपघात टाळण्यासाठी व्यापक जनजागृती हवी : छगन भुजबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 6:33 PM

प्रादेशिक परिवहन विभागाकडून तयार करण्यात आलेली रस्ता सुरक्षा मार्गदर्शिका पुस्तिका सर्वांसाठी अतिशय उपयुक्त आहे; मात्र य ही पुस्तिका सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रभावी 'तजवीज' करणेही तितकेच गरजेचे आहे, तरच या पुस्तिकेचा उपयोग होईल.

ठळक मुद्दे३२व्या रस्ता सुरक्षा अभियानाचा शुभारंभअवजड वाहनचालकांचे प्रशिक्षण शिबिर घ्यावे

नाशिक : शहरांसह जिल्ह्यात विविध रस्त्यांवर होणारे अपघात टाळण्यासाठी रस्ता सुरक्षा, वाहतुक नियमांचे पालन व त्याचे गांभीर्य जनसामान्यांना पटवून देण्याचा व्यापक प्रयत्न प्रादेशिक परिवहन विभागासह शहर वाहतुक शाखेकडून रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने व्हावा, असे मत राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील नियोजन भवन येथे प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत सोमवारी (दि.१८) ३२व्या रस्ता सुरक्षा अभियानाचे उद‌्घाटन करण्यात आले. यावेळी भुजबळ प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. याप्रसंगी व्यासपिठावर खासदार डॉ. भारती पवार, आमदार नरेंद्र दराडे, सरोज अहिरे, देवयानी फरांदे, सीमा हिरे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय, महापालिका आयुक्त कैलास जाधव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विनय अहिरे आदी उपस्थित होते.यावेळी भुजबळ म्हणाले, प्रादेशिक परिवहन विभागाकडून तयार करण्यात आलेली रस्ता सुरक्षा मार्गदर्शिका पुस्तिका सर्वांसाठी अतिशय उपयुक्त आहे; मात्र य ही पुस्तिका सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रभावी 'तजवीज' करणेही तितकेच गरजेचे आहे, तरच या पुस्तिकेचा उपयोग होईल. १८ जानेवारी ते १७ फेब्रुवारी २०२१पर्यंत होणाऱ्या या अभियानात विद्यार्थ्यांना देखील विविध उपक्रमांच्या माध्यमातून रस्ता सुरक्षेविषयक माहिती वेळोवेळी दिली जावी, अशी सुचनाही त्यांनी यावेळी केली. येवला येथे तयार करण्यात आलेला 'ट्रॅफिक पार्क' प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) स्वत:च्या ताब्यात घेवून या माध्यमातून जनसामान्यांमध्ये सर्वच प्रकारच्या वाहतूक नियमांची जनजागृती करण्यावर भर द्यावा, असेही भुजबळ यावेळी म्हणाले.लॉकडाऊन काळात शेतकऱ्यांनी पिकवलेला भाजीपाला सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागामार्फत भाजीपाला वाहतुक करणाऱ्या वाहनांकरिता ऑनलाईन पास उपलब्ध करुन देण्यात आले, ही अत्यंत चांगली बाब ठरली, असे सुरज मांढरे यांनी यावेळी मनोगतातून सांगितले. दरम्यान, 'रस्ता सुरक्षा मार्गदर्शिका' व रस्ता सुरक्षेबाबतच्या माहितीपत्रकांचे प्रकाशन यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.---

अवजड वाहनचालकांचे प्रशिक्षण शिबिर घ्यावेमालट्रक, ट्रेलर, कंटेनरसारखी अवजड वाहने चालविणाऱ्या चालक-वाहकांचे दर दोन वर्षांनी आरटीओने प्रशिक्षण शिबिर घेत त्यांना वाहतुक नियमांविषयी जागरुक करण्याचा प्रयत्न करावा असाही सल्ला भुजबळ यांनी यावेळी दिला. अपघातस्थळी अपघातग्रस्त व्यक्तींना तत्काळ मदत उपलब्ध करुन देण्यासाठी आजही सर्वसामान्य व्यक्ती घाबरतो, त्यामुळे अनेकदा अपघातातील जखमींना प्राण गमवावे लागते. हे टाळण्यासाठी अपघातातील जखमींना मदतीसाठी पुढे यावे, या उद्देशाने जनजागृतीची गरज असल्याचे ते म्हणाले.---- 

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयRto officeआरटीओ ऑफीसroad safetyरस्ते सुरक्षाAccidentअपघातChagan Bhujbalछगन भुजबळSuraj Mandhareसुरज मांढरे