नाशिक : नाशिकरोडमधील फ्लॅट व कार नावावर करून देत नाही, तसेच पगाराचे पैसे देत नसल्याच्या कारणावरून पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत असलेल्या पतीने परिचारिका असलेल्या पत्नीस बेदम मारहाण करून घरातून हुसकून दिले असून, याप्रकरणी विवाहितेच्या फिर्यादीनुसार नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रोहिणी पुंडलिक पावसे (३२, रा. पार्थप्रभा अपार्टमेंट, जेलरोड. सध्या रा. प्रीतीसुगंध अपार्टमेंट, बोराडे मळा, जेलरोड) या जिल्हा रुगणालयात परिचारिका आहेत़ २०१२ मध्ये त्यांचा निफाड तालुक्यातील करंजगाव येथील पुंडलिक धोंडीराम पावसे याच्याशी विवाह झाला़ पावसे हा पोलीस उपनिरीक्षक असून त्याची अहमदनगर येथे नियुक्ती आहे़ विवाहानंतर पती व सासू-सासरे यांच्याकडून पगार व नाशिकरोड येथील फ्लॅट व कार नावावर करून देण्याची सातत्याने मागणी केली जात होती़ तसेच पती पुंडलिक याचे औरंगाबादच्या महिलेसोबत प्रेमसंबंध असल्याने तिच्याशी विवाह करण्यासाठी फारकतीची मागणी केली जात असून, त्यासाठी २२ फेब्रुवारीला मारहाण करून घराबाहेर हुसकून दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे़ दरम्यान, तेव्हापासून रोहिणी पावसे या माहेरी असून त्यांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यात पती व सासरच्यांविरोधात फि र्याद दिली आहे़
पोलीस उपनिरीक्षकाकडून पत्नीचा छळ
By admin | Published: March 20, 2017 1:13 AM