शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
3
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
4
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
5
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
6
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
7
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
8
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
9
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
10
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
11
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
12
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
13
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
14
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
15
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
16
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
17
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
18
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
19
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
20
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप

सुरक्षेला प्राधान्य : वन्यजीवांचा अधिवास राहणार ‘समृध्द’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2019 4:40 PM

वन्यजिवांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले जात आहे. वाइल्डलाइफ इन्स्टिट्यूट इंडियाच्या मार्गदर्शक तत्वे विचारात घेऊन संस्थेने महामार्गाचे संपुर्ण सर्वेक्षण करत सुचविलेल्या सुचनांनुसार महामार्गाची संरचनेत बदल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले

ठळक मुद्दे२३ ते २५भुयारीमार्ग व उड्डाणमार्ग तयार केले जात आहेनैसर्गिक अधिवासात मुक्त संचार करता येणार असल्याचा दावा महामार्गावर वन्यजिवांकरिता भुयारी मार्ग तयार केले जाणार

नाशिक : मुंबई-नागपूरला जोडणारा एक्स्प्रेस महामार्ग अर्थात महाराष्ट्रसमृद्धी महामार्ग विकसित करताना दूरदृष्टीचा अवलंब करीत वन्यजीवांच्या संवर्धन व संरक्षणाबाबत गांभीर्याने उपाययोजना करण्यात आला आहेत. यासाठी राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) वाइल्डलाइफ इन्स्टिट्यूट आॅफ इंडिया या संस्थेची मदत घेत वन्यजीवांचा अधिवास सुरक्षित व ‘समृध्द’ रहावा यासाठी वन्यजीव भुयारीमार्ग व उड्डाणमार्ग तयार करण्याची शिफारस करण्यात आली. त्यानुसार महामार्गाच्या संरचनामध्ये बदल करण्यात आल्याची माहिती महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिली.‘समृद्धी’ महामार्ग ७०१ किलोमीटर लांबीचा असून सुमारे १० जिल्हे, २६ तालुक्यांसह ३१२ गावांना जोडणाऱ्या या महामार्गाचे बांधकाम १६ भागांमध्ये विभागून पुर्णत्वास नेले जात आहे. समृद्धी महामार्ग जंगलांच्या भागातूनही जाणार आहे. तीन अभयारण्यक्षेत्रांच्या जवळून महामार्ग विकसीत होणार आहे. त्यामुळे वन्यजिवांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले जात आहे. वाइल्डलाइफ इन्स्टिट्यूट आॅफ इंडियाच्या मार्गदर्शक तत्वे विचारात घेऊन संस्थेने महामार्गाचे संपुर्ण सर्वेक्षण करत सुचविलेल्या सुचनांनुसार महामार्गाची संरचनेत बदल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. वन्यजीवांचा वावर असलेल्या भागामध्ये त्यांचा नैसर्गिक अधिवास सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यकतेनुसार सुमारे २३ ते २५भुयारीमार्ग व उड्डाणमार्ग तयार केले जात आहे. त्यांची रचना त्या भागातील नैसर्गिक रचनेला अनुसरूनच असेल यासाठी प्रयत्न केले जात आहेत. दाट वृक्षराजींनी वेढलेल्या तसेच काही प्रमाणात पाणथळ जागा तयार करून अंडरपास व ओव्हरपासची बांधणी करण्यात येणार आहे. जेणेकरून वन्यजीवांना महामार्गाच्या परिसरात सुरक्षितरित्या त्यांच्या नैसर्गिक अधिवासात मुक्त संचार करता येणे शक्य होणार असल्याचा दावा महामंडळाने केला आहे.-या अभयारण्यांच्या झोनमधून ‘समृध्दी’समृध्दी महामार्ग तीन अभयारण्यांच्या नैसर्गिकदृष्ट्या अत्यंत संवेदनशील असलेल्या कॉरिडोरमधून जात आहे. या अभयारण्यक्षेत्रांमध्ये विविध प्रकारच्या वन्यजीवांचा मुक्त संचार आहे. त्यामुळे त्यांचा अधिवास सुरक्षित रहावा यासाठी विशेष खबरदारी महामंडळाकडून महामार्ग बांधणी करताना घेतली जात आहे. ठाणे जिल्ह्यातील तानसा, बुलढाणा जिल्ह्यातील काटेपूर्णा, वशिम जिल्ह्यातील कारंजा सोहळ या तीन अभयारण्यांच्या क्षेत्रातून महामार्ग जाणार आहे. तसेच कसारा,इगतपुरी, सिन्नर या तालुक्यांमधील वनपरिक्षेत्राची माहिती करून घेत या दोन्ही तालुक्यांमधील वनपरिक्षेत्रांतर्गत महामार्गावर वन्यजिवांकरिता भुयारी मार्ग तयार केले जाणार आहेत.

 

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गNashikनाशिकwildlifeवन्यजीवGovernmentसरकारforestजंगल