दिंडोरी : केंद्रशासनाचा जास्तीत जास्त निधी आणून भरीव विकासासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केले. जनआशीर्वाद यात्रा समारोपानंतर नाशिक येथे जाताना दिंडोरी येथे डॉ. पवार यांनी रविवारी रात्री भेट देत कार्यकर्त्यांशी संवाद साधला. फटाक्यांच्या आतषबाजीत पवार यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. याप्रसंगी भाजपा तालुकाध्यक्ष नरेंद्र जाधव, संघटन सरचिटणीस तुषार वाघमारे, माजी नगराध्यक्ष प्रमोद देशमुख, शहराध्यक्ष शामराव मुरकुटे, युवामोर्चा तालुकाध्यक्ष अमर राजे, भास्करराव कराटे, नगरसेवक नीलेश गायकवाड, सविता देशमुख, निर्मला जाधव, रोहिणी पगारे, आशा कराटे, मंदा पारख, मंगला शिंदे, चंद्रकांत राजे, बाबुशेठ मणियार, संपत पिंगळ, विलास देशमुख, सरपंच साजन गावीत, प्रल्हाद दळवी, चेतन व मित्रपरिवार, कैलास धात्रक, काकासाहेब वडजे, संजय कदम, रणजीत देशमुख, महेश कुलकर्णी, धीरज चव्हाण, राजू शिंदे, अनिल गाढे, बाळासाहेब सोनवणे उपस्थित होते.
क्रिशा फाऊंडेशनच्या संस्थापिका उज्ज्वला कोथळे-ऊगले यांनी औक्षण करत व विठ्ठल - रखुमाईच्या प्रतिकृती देऊन डॉ. पवार यांचे स्वागत केले. तसेच कोरोनामुळे आधारहीन झालेल्या महिलांच्या समस्या मांडल्या. यावेळी संध्या जोशी, ज्योती देवकर, नसरीन मणियार, ज्योती पाचोरकर उपस्थित होत्या. शासनस्तरावर अशा सर्व महिलांसाठी उपाययोजना करण्यासाठी तत्परतेने प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले. काही कार्यकर्त्यांनी स्थानिक समस्या, अंतर्गत रस्त्यांची दुर्दशा, भाजीपाला विक्रेत्यांची होणारी परवड व पिळवणूक याकडे लक्ष वेधले. याबाबत तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.