सिन्नर येथील नर्मदा मातोश्री लॉन्स येथे सकल मराठा समाजाची आरक्षणाबाबत बैठक पार पडली. त्यात माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील बोलत होते. काही विषय गांभीर्याने न घेतल्याने आरक्षण टिकले नाही. केंद्र सरकारने फेरयाचिका दाखल केल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी न्यायालयीन लढ्यासोबतच रस्त्यावर उतरुन आंदोलनातून सर्वांचे लक्ष वेधले पाहिजे, असा सूर काही उपस्थितांनी व्यक्त केला. तर मोर्चे काढून समाजबांधव एकत्र आले आहेत. आता मराठा नेत्यांनी एकत्र येऊन आरक्षण मिळवून द्यावे, असे मत काही बांधवांनी व्यक्त केले. चर्चेत आर. के. मुंगसे, नामदेव कोतवाल, सविता कोठूरकर, किशोर देशमुख, बाळासाहेब हांडे, भाऊसाहेब शिंदे, कृष्णाजी भगत, माजी नगराध्यक्ष विठ्ठल उगले यांच्यासह समाजबांधवांनी सहभाग घेऊन आपली भूमिका मांडली.
बैठकीस दिनकर आढाव, उद्धव निमसे, दिनकर पाटील, केदा आहेर, दिगंबर देशमुख, अॅड. राजेंद्र चव्हाणके, नानासाहेब देशमुख, भाऊसाहेब शिंदे, स्वप्निल डुंबरे, कल्पना रेवगडे, बहिरु दळवी, छबू थोरात, सुनील बच्छाव, दिगंबर देशमुख, श्रद्धा नरोडे, अण्णासाहेब गडाख, विठ्ठल जपे, योगेश डावरे, रामहरी खताळे, सुनीता काळोखे, गिरीष पालवे, संजय पवार, योगेश डावरे, रामहरी खताळे, राजेंद्र वाघेपाटील यांच्यासह मराठा समाजबांधव उपस्थित होते.
-------------------------------
दिंडोरीतही समाजबांधवांची बैठक
दिंडोरी : मराठा आरक्षणाच्या मुद्यावर येथील संस्कृती लॉन्स येथेही बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मराठा आरक्षणाची लढाई जिंकायची असेल तर सर्व संघटनांच्या नेत्यांनी एकाच व्यासपीठावर यावे. सामूहिक प्रयत्नांनीच हा प्रश्न सुटू शकेल, असे सांगत राधाकृष्ण विखेपाटील यांनी सरकारमधील मंत्र्यांमध्येच एकवाक्यता नसल्याचा आराेप केला. यावेळी खासदार डॉ. भारती पवार, भाजप जिल्हाध्यक्ष केदा आहेर, ज्येष्ठ नेते चंद्रकांत राजे, शिवाजी पिंगळ, भाजप तालुकाध्यक्ष नरेंद्र जाधव, राष्ट्रवादीचे नेते गंगाधर निखाडे, जालखेडचे उपसरपंच जीवन मोरे, संजय निरगुडे, किशोर देशमुख, रवी जाधव, संगम देशमुख ,पिंटू बोरस्ते आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी माजी नगराध्यक्ष प्रमोद देशमुख, योगेश बर्डे, सोमनाथ जाधव , नितीन देशमुख, विक्रमसिंह राजे, संतोष मुरकुटे आदी उपस्थित होते.
फोटो - ०७ सिन्नर मराठा
सिन्नर येथे सकल मराठा समाज बांधवांच्या बैठकीस उपस्थित माजी मंत्री राधाकृष्ण विखेपाटील, नामदेव कोतवाल, कृष्णाजी भगत, दिनकर पाटील, उद्धव निमसे, विठ्ठल उगले, आर. के. मुंगसे, बाळासाहेब हांडे आदी.
===Photopath===
070621\07nsk_80_07062021_13.jpg
===Caption===
फोटो - ०७ सिन्नर मराठा सिन्नर येथे सकल मराठा समाज बांधवांच्या बैठकीस उपस्थित माजी मंत्री राधाकृष्ण विखेपाटील, नामदेव कोतवाल, कृष्णाजी भगत, दिनकर पाटील उध्दव निमसे, विठ्ठल उगले, आर. के. मुंगसे, बाळासाहेब हांडे आदी.