शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
2
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
3
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
4
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
5
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
6
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
7
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
8
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
9
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
10
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
11
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
12
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
13
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
14
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
15
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
16
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
17
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
18
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
19
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर
20
"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय

‘त्या’ उमेवारांवर अन्याय होणार नाही : रावते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2018 7:05 PM

राज्य सेवा आयोगाने घेतलेल्या वाहक निरीक्षक पदासाठीच्या पात्र विद्यार्थ्यांवर न्यायालयाने त्यांची निवड रद्द ठरविण्याचा जो निर्णय दिला आहे, त्या विरोधात सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असून, पात्र विद्यार्थ्यांवर कोणताही अन्याय होऊ दिला जाणार नाही, अशी ग्वाही राज्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी विद्यार्थ्यांना दिली.

ओझर : राज्य सेवा आयोगाने घेतलेल्या वाहक निरीक्षक पदासाठीच्या पात्र विद्यार्थ्यांवर न्यायालयाने त्यांची निवड रद्द ठरविण्याचा जो निर्णय दिला आहे, त्या विरोधात सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असून, पात्र विद्यार्थ्यांवर कोणताही अन्याय होऊ दिला जाणार नाही, अशी ग्वाही राज्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी विद्यार्थ्यांना दिली.राज्य सेवा आयोगाने २०१७ साली घेतलेल्या सहायक मोटार वाहक निरीक्षक पदासाठी पात्र झालेल्या ८३३ उमेदवारांना २०१८ साली शिफारस पत्र दिले होते; मात्र यावर याचिका दाखल केल्याने उच्च न्यायालयाने ही भरती रद्द ठरविल्याने राज्यातील ८३३ विद्यार्थ्यांवर या पदासाठीची नियुक्ती सोडण्याची वेळ आली आहे. यात नाशिक जिल्ह्यातील ५० विद्यार्थ्यांचा समावेश आहे.या सर्व विद्यार्थ्यांनी आपली कैफियत आमदार अनिल कदम यांच्याकडे मांडल्यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांना घेऊन मुंबई येथे रावते यांची भेट घेतली. या भेटीत रावते यांनी झालेली भरती ही नियमानुसारच आहे, त्यामुळे उगीचच न्यायालयाने भरती रद्द करण्याचा जो निर्णय दिला आहे, त्याविरोधात सरकार सर्वोच्च न्यायालयात जाऊन भक्कमपणे बाजू मांडणार असल्याचे स्पष्ट करीत पात्र विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही, याची ग्वाही दिली.यावेळी कोल्हापूरचे आमदार चंद्रदीप नरके उपस्थित होते. निवड झालेले विद्यार्थी भूषण मोरे, निकिता जाधव, गोरक्ष कोरडे, राहुल ढोबळे, नीतेश जगताप, शशिकांत पाटील, राहुल सरोदे, गायत्री चव्हाणके, सचिन जाधव यांच्यासह निवड झालेले विद्यार्थी उपस्थित होते.

टॅग्स :GovernmentसरकारMPSC examएमपीएससी परीक्षा