नाशिक : मुंबई-नागपूरला जोडणाºया समृद्धी महामार्गाची घोषणा झाल्यावर सर्वांत अगोदर या महामार्गाला विरोध करून जनआंदोलन उभारणाºया सिन्नर तालुक्यातील शिवडे ग्रामस्थांच्या भेटीसाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री (सार्वजनिक उपक्रम) एकनाथ शिंदे बुधवारी नाशिक भेटीवर येत असून, त्यांच्या उपस्थितीत शिवड्याचे शेतकरी व समृद्धी महामार्गाच्या अधिकाºयांची संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. समृद्धी महामार्गासाठी शिवड्याच्या आजूबाजूच्या शेतकºयांनी जागा दिल्यामुळे अस्वस्थ शेतकºयांकडून समझोत्याचा प्रस्ताव ठेवला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, समृद्धीचा मोठा तिढा सुटण्यास त्यामुळे मदत होणार आहे.समृद्धी महामार्गासाठी नाशिक जिल्ह्णातील इगतपुरी व सिन्नर तालुक्यातील ४९ गावांतील जमिनी थेट खरेदी करण्यात येणार आहे. त्यासाठी शासनाने बाजारभावाच्या पाचपट दर जाहीर केला असून, दर जाहीर झाल्यानंतर या महामार्गासाठी जमिनी देण्यास नकार देणाºया अनेक शेतकºयांनी संमती दिली आहे. तथापि, या महामार्गासाठी सर्वात अगोदर सिन्नर तालुक्यातील शिवडे येथील शेतकºयांनी जाहीर विरोध दर्शविला होता.मोजणीसाठी आलेल्या अधिकाºयांना गावबंदी करून त्यांनी पिटाळून लावल्याने शेतकºयांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. त्यांच्या या आंदोलनामुळे तालुक्यातील अन्य गावातील शेतकºयांनीही त्यात सहभागी होत प्रशासनाची दमछाक केली होती. शिवडे येथील शेतकºयांनी आपल्या शेतात गळफास घेण्यासाठी दोरखंड बांधल्यामुळे संपूर्ण राज्यात शिवड्याचे नाव गाजले होते. एकीकडे समृद्धीसाठी जिल्ह्णात ५४ टक्के जागेचे संपादन झालेले असताना दुसरीकडे शिवड्यात रस्त्यासाठी जागेची मोजणीदेखील झालेली नाही. त्यामुळे समृद्धीच्या कामात मोठा खोळंबा निर्माण झाला. मध्यंतरी सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवड्याच्या शेतकºयांशी चर्चा करण्याची तयारीही दर्शविली होती व त्यासाठी गेल्या महिन्यात जवळपास ४७ शेतकरी मुंबईत शिंदे यांच्या भेटीसाठी गेले होते.परंतु त्याच दिवशी भाजपाचे खासदार चिंतामण वणगा यांचे निधन झाल्यामुळे शिवड्याच्या शेतकºयांची शिंदे यांच्याशी भेट होऊ शकली नाही त्यामुळे बुधवारी दुपारी ३.३० वाजता स्वत: एकनाथ शिंदे नाशिक येथे येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत समृद्धी महामार्गाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी बैठक होणार असून, त्यानंतर शिंदे शिवडे येथील शेतकºयांशी चर्चा करून त्यांच्या मागण्या जाणून घेणार आहेत. अशा आहेत मागण्यासमृद्धी महामार्ग रद्द करा, शिवडे गावातून महामार्ग नेण्याऐवजी अन्यत्र न्या, शेतकºयांना वाढीव मोबदला, त्यांच्या मुलांना शासकीय नोकरीत सामावून घ्या, अशा मागण्या आहेत.