प्रभागातून भाजपच्या उमेदवारीवर हेमंत शेट्टी, जगदीश पाटील सरिता सोनवणे, शांताबाई हिरे असे चौघे निवडून आले होते. हिरे यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त आहे. माजी आमदार बाळासाहेब सानप यांच्या विरोधात जगदीश पाटील यांनी लेटरबॉम्ब टाकून रोष ओढवून घेतल्याने भाजपातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला होता त्यातून सानप यांना विधानसभा निवडणुकीत फटका बसला सानप पक्षातून बाहेर पडले कालांतराने ते पुन्हा पक्षात आले आहे. त्याचा प्रभाव राहणार आहेच. गतवेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी आव्हान दिले होते, मात्र यंदा राष्ट्रवादी काँग्रेससह शिवसेनेचे आव्हान राहणार आहे. काँग्रेस पक्ष तसेच मनसेचे विशेष प्राबल्य प्रभागात दिसून येत नाही. विशेष म्हणजे काँग्रेस पक्षाच्या माजी राज्यमंत्री डॉ. शोभा बच्छाव यांचा एकेकाळी हा प्रभाग होता. त्यामुळे काँग्रेसला तसेच मनसेला येथे अस्तित्व दाखवून द्यावे लागणार आहे. महाविकास आघाडीने एकत्र निवडणूक लढली अनेक इच्छुकांची अडचण होणार आहे.
इन्फो बॉक्स
संभाव्य उमेदवार
भाजप - जगदीश पाटील, हेमंत शेट्टी, सरिता सोनवणे, मोनिका हिरे, रूपाली गावंड, गायत्री कुलकर्णी, सचिन ढिकले, उत्तम उगले, निर्मला कांबळे, प्रकाश नागरे,
राष्ट्रवादी काँग्रेस - कविता कर्डक, सागर लामखेडे, राजेश माने, महेश शेळके, राजू जाधव
शिवसेना - भगवान भोगे, रिमा भोगे, डॉ. विशाल घोलप, वास्तव दोंदे, लक्ष्मी ताठे, चांगदेव गुंजाळ, महेंद्र बडवे,
काँग्रेस - चंद्रकांत निकम, बाळासाहेब वाघमारे, नीलेश गायकवाड
मनसे - योगेश दाभाडे, स्वप्निल ओढाणे
इतर - सतनाम राजपूत, कल्पना मुर्तडक
इन्फो बॉक्स
प्रभागातील समस्या
- गावठाण रस्ते डांबरीकरण झालेले नाही
- गावठाण भागात कोणतेही विकासकाम नाही.
- वाहतूक कोंडी समस्या, झोपडपट्टी भागात आरोग्य समस्या
- उघड्या गटार, नालेसफाई, नवीन विकास कामे नाही
- नवीन वसाहतीत पक्के रस्ते नाहीत
इन्फो बॉक्स
पाच वर्षात प्रभागात कोणत्याही प्रकारचे नवीन काम नाही
लोकप्रतिनिधी प्रभागातील शेवटच्या रहिवासी भागात पोहोचले नाही. नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या जाणून घेण्याची तसदी लोकप्रतिनिधींनी केली नाही. प्रभागात स्वच्छ पाणी, आरोग्य प्रश्न मार्गी लागला, नवीन वसाहतीत राहणाऱ्या
नागरिकांना समस्यांना तोंड द्यावे लागते आहे.
- कविता कर्डक, माजी नगरसेविका