नाशिकचे साहित्य संमेलन तीन आठवड्यांवर येऊनही कोरोनाचे वाढते प्रमाण गत महिन्यापासून कायम आहे. स्वत: स्वागताध्यक्षांना कोरोना झाला. अशा परिस्थितीत ज्याला मराठी साहित्य क्षेत्रातील ज्ञानपीठ मानले जाते, असा ‘जनस्थान’ पुरस्कारदेखील स्थगित करण्यात आला. ज्या जनस्थान पुरस्कार सोहळ्यासाठी केवळ ७०० ते ८०० नागरिकांची उपस्थिती असते, तो १० मार्चचा पुरस्कार सोहळा रद्द केल्याचे बघूनदेखील अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षांना उपरती झालेली नाही. केवळ यंदाच्या आर्थिक वर्षात मिळालेला संमेलनाचा निधी हातातून जाऊ नये, हेच त्यामागील कारण असण्याची शक्यता असल्याच्या चर्चेने जोर पकडला आहे. अन्यथा संमेलनाला येणाऱ्या साहित्यिकांमधील बहुतांश जण हे ज्येष्ठ नागरिक आहेत. संमेलनाला दिवसभर हजेरी लावणाऱ्यांतही ज्येष्ठांचे प्रमाण अधिक असल्याचे माहीत असूनही महामंडळाचे अध्यक्ष संमेलन आयोजनाबाबत फेरविचार करायचादेखील विचार करीत नाहीत, हे निर्ढावलेपणाचेच लक्षण मानले जात आहे. जानेवारी, फेब्रुवारीत झालेल्या पाचशे-हजार उपस्थितीच्या विवाह सोहळ्यांमुळे कोरोना पुन्हा फैलावल्याचा आरोग्य विभागाचा दावा आहे. अशा परिस्थितीत जिथे दहा हजारांवर नागरिक येण्याची शक्यता आहे, अशा संमेलनामुळे कोरोना फैलावणार नाही का? हा विचारदेखील महामंडळ का?
?
करीत नाही, हाच प्रश्न आहे.
इन्फो
तर ठपका कुणावर?
अजूनही संमेलन पुढे- मागे सरकवता येऊ शकते; मात्र संमेलनामुळे कुणा ज्येष्ठ साहित्यिकाला कोरोनाची लागण झाली किंवा तीन दिवसांच्या गर्दीमुळे कोरोनाचा मोठ्या प्रमाणात फैलाव झाला तर त्याची जबाबदारी महामंडळ घेणार आहे का? असा सवालदेखील साहित्य वर्तुळात चर्चिला जाऊ लागला आहे. संमेलनामुळे कुणा मान्यवराचे किंवा सामान्य रसिकांचे बरे-वाईट घडल्यास त्याचा ठपका महामंडळ, शासन की आयोजक संस्था स्वीकारणार ? तसेच जिथे प्रचंड सुरक्षेत वावरणारे, चेकींगसह सर्व सुविधा चोवीस तास उपलब्ध असणारे संमेलन आयोजनाच्या कामातील थोड्याशा गर्दीमुळे स्वागताध्यक्षच जर बाधित होतात, तिथे इतर ज्येष्ठांची काय अवस्था होईल, त्याचा विचार करूनच संमेलन आयोजनाचा विचार व्हावा, अशीच चर्चा साहित्य वर्तुळात आहे.
लोगो
साहित्य संमेलनाचा लोगो वापरावा.