मालेगाव: शहरात कोरोना विषाणूची मोठ्या प्रमाणात रुग्णांना बाधा झाल्याने तेथील परिस्थितीचे सूक्ष्म नियोजन करून त्याचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रशासन युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. तालुक्यातील आरोग्य यंत्रणा अधिक मजबूत करण्यासाठी खासगी युनानी डॉक्टर्स व खासगी परिचारिकांची सेवा घेण्यात येणार आहे. त्याच बरोबर क्वॉरण्टाइन रुग्णांसाठी स्वतंत्र शाळा, खासगी रुग्णालये अधिग्रहीत करण्यात येणार असल्याची माहिती मालेगाव इमर्जन्सी आॅपरेशन सेंटरचे प्रमुख समन्वयक डॉ. पंकज आशिया यांनी दिली.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मालेगाव येथे इमर्जन्सी आॅपरेशन सेंटरची स्थापना करण्यात आली आहे. या सेंटरचे प्रमुख समन्वयक म्हणून डॉ.पंकज आशिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विश्रामगृहात आयोजित आढावा बैठकीत डॉ. आशिया बोलत होते. आरोग्य प्रशासनाच्या उपलब्ध वैद्यकीय सेवा सुविधांचा आढावा घेताना वाढत्या रुग्णांची संख्या लक्षात घेता, त्यासाठी खासगी रुग्णालये, शाळा व महाविद्यालयांच्या इमारती अधिग्रहीत करून सुसज्ज ठेवण्याचे निर्देश त्यांनी दिले. नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
खासगी परिचारिकांची सेवा घेणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2020 10:28 PM
शहरात कोरोना विषाणूची मोठ्या प्रमाणात रुग्णांना बाधा झाल्याने तेथील परिस्थितीचे सूक्ष्म नियोजन करून त्याचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रशासन युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. तालुक्यातील आरोग्य यंत्रणा अधिक मजबूत करण्यासाठी खासगी युनानी डॉक्टर्स व खासगी परिचारिकांची सेवा घेण्यात येणार आहे. त्याच बरोबर क्वॉरण्टाइन रुग्णांसाठी स्वतंत्र शाळा, खासगी रुग्णालये अधिग्रहीत करण्यात येणार असल्याची माहिती मालेगाव इमर्जन्सी आॅपरेशन सेंटरचे प्रमुख समन्वयक डॉ. पंकज आशिया यांनी दिली.
ठळक मुद्देपंकज आशिया : जमावबंदीची कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश