सुरगाणा : शहरासह तालुक्यात वादळ वाऱ्याने बहुतांश ठिकाणी तडाखा दिल्यानंतर वाऱ्याचा वेग काहीसा कमी होऊन पावसाला सुरुवात झाली आहे. दरम्यान, तालुक्याचा वीज पुरवठा खंडित झाला.
वादळी वाऱ्याने तालुक्यात थैमान घालत अनेक ठिकाणी घरांचे व फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. शहरासह तालुक्यातील उंबरठाण, बोरगाव, पळसन, मनखेड, सांबरखल, भिंतघर, जामुनमाथा आदी गाव व पाडा परिसरात नुकसान झाले आहे. येथून जवळच असलेल्या जामुनमाथा येथील सय्यद इब्राहिम नाईक यांच्या ९ एकर जमिनीवर असलेल्या विविध प्रकारच्या ५०० झाडांवरील आंबे गळून पडल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. घरांचे छप्पर उडाल्याने तसेच हापूस, लंगडा हापूस, पायरी हापूस, केशर, कनेर, राजापुरी, बदाम इत्यादी प्रकारचे आंबे तसेच इतर पिकांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शासनाने नुकसान भरपाई देण्याची मागणी केली जात आहे. सोमवारी पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत वादळी वारा सुटलेला होता, तर रात्रीपासूनच सुरू झालेली पावसाची रिपरिप दिवसभर सुरूच होती. वादळामुळे तालुक्यात तब्बल तीस तास वीज पुरवठा खंडित झाला.
-----------------------
जामुनमाथा येथील सय्यद नाईक यांच्या नऊ एकरांमधील आमराईत मोठ्या प्रमाणात गळून पडलेले आंबे. (१८ सुरगाणा)
===Photopath===
180521\18nsk_2_18052021_13.jpg
===Caption===
१८ सुरगाणा