रविवारी सायंकाळी साडेसहा वाजता साकोरा परिसरात वारेवादळासह जोरदार पावसाला सुरु वात झाली. त्या पावसाचा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना फटका बसला. शिवमळा शिवारातील गट क्र. १०५२/१ मधील दिलीप साहेबराव बोरसे यांच्या एक एकर शेतीत सन डिसेंबर २०१५ मध्ये शेड नेटची उभारणी केली होती. यावर्षी शिमला मिरची तयार असतांना अचानक रात्री झालेल्या वादळी पावसाने प्रचंड नुकसान झाले . दुसºया दिवशी सकाळी बोरसे शेतात गेले असता नुकसान झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तलाठी कपिल मुत्तेपवार यांनी पंचनामा करून साडेचार लाख रूपयांचे शेड नेटचे तसेच दोन लाख तीस हजार रुपयांच्या शिमला मिरचीचे नुकसान झाल्याची शासकीय दप्तरात नोंद करून घेतली. यावेळी राजेंद्र भामरे, भारत बोरसे, संदिप बोरसे, श्रीधर बोरसे, वसंत बोरसे आदी शेतकरी उपस्थित होते.
वादळी पावसाने शेतीमालाचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2018 5:25 PM