नाशिक : दि इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ आर्किटेक्टची (आयआयए) राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत महाराष्टÑाच्या संघाने सर्वाधिक बक्षिसे मिळवत सर्वसाधारण विजेता म्हणून बाजी मारली. महाराष्ट्राच्या चमूने क्रि केट, टेबल टेनिस, बॅडमिंटन खेळात प्रतिनिधित्व केले व सर्वाधिक २३ पारितोषिके महाराष्ट्राला मिळवून दिली. क्रि केटमध्ये महाराष्ट्र रेड संघाने सर्व सामने जिंकून अंतिम सामन्यात गुजराथ गरु डा संघाला पराभूत केले. अंतिम सामन्यात महाराष्ट्र रेड संघाने १५ षटकांमध्ये ८ बाद ११४ धावा केल्या. तर गुजराथ गरु डा संघ प्रत्युत्तरादाखल ९५ धावाच करू शकला.नाशिककर सामनावीर पीयूष दुगड याची तुफानी ६३ धावांची खेळी अंतिम सामन्याचे वैशिष्ट्य ठरली. विजेत्या संघाला राष्ट्रीय अध्यक्ष दिव्य कुश यांच्या हस्ते गौरवण्यात आले. साखळी सामने, उपउपांत्य फेरी व उपांत्य फेरीच्या सामन्यांमध्ये हितेश गुजर, पीयूष दुगड, कौशल कटाळे, सुनील भाले हे विविध सामन्यांमध्ये सामनावीर ठरले. टेबल टेनिस व बॅटमिंटनमध्ये उपेंद्र पंडित, विपुल साळवनकर, अनिकेत खोडवे, राहुल दिवाणी, कांचन बंबाळ, स्वराली सगारे, स्नेहल शेडगे यांनी महाराष्ट्राच्या चमकदार कामगिरीत मोलाचे योगदान दिले. विजेत्या संघाचे संस्थेचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष प्रफुल कारखानीस, महाराष्ट्र अध्यक्ष सतीश माने, रवी पारुं डेकर, संजीव बोरसे, संजय पाठे, लालीचन झकारियस, सी. आर. राजू, नाशिक शाखेचे समिती सदस्य व सर्व सभासदांनी अभिनंदन केले.