शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
2
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
3
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
4
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
5
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
6
लुटेरी दुल्हन! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने रचला भयंकर कट; मौल्यवान वस्तू घेऊन गायब
7
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
8
बाबा झाल्यानंतर रणवीर सिंहचा आनंद गगनात मावेना, म्हणाला, "सध्या मी ड्युटीवर आहे..."
9
एकाचा 'हल्लाबोल', मग दुसरा 'पलटवार'! निवडणुकीच्या तोंडावर सलील कुलकर्णींची पोस्ट, म्हणाले- "सध्या प्रचारात..."
10
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
11
मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब, ३ मंत्री आणि ६ आमदारांच्या घरांवर हल्ला, ५ जिल्ह्यांत संचारबंदी 
12
Chikhli Vidhan sabha 2024: तुल्यबळ वाटणारी लढत अखेरच्या टप्प्यात घेतेय वेगळे वळण!
13
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा
14
निशाणी आहे चपला; घालायच्या कशा?; उमेदवाराचा सवाल, निवडणूक आयोगाने दिले उत्तर
15
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
16
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
17
Maharashtra Election 2024 Live Updates: बारामती हेलिपॅडवर निवडणूक आयोगाकडून शरद पवारांच्या बॅगेची तपासणी
18
योगी आदित्यनाथ यांची आज कोल्हापुरात सभा, तपोवन मैदान सभेसाठी सज्ज
19
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
20
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला

‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेतील शुभमला जिंकवण्यासाठी रेसिपीजच्या विजेत्यांची उत्सुकता शिगेला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2021 6:13 PM

सादर रेसिपीजमध्ये पल्लवी खुटाडे, सुवर्णा सावंत, संपदा गिते आणि प्रियांका गांधी विजेते.

ठळक मुद्देसादर रेसिपीजमध्ये पल्लवी खुटाडे, सुवर्णा सावंत, संपदा गिते आणि प्रियांका गांधी विजेते.

नाशिक : स्टार प्रवाहवर झळकणाऱ्या ‘फुलाला सुगंध मातीचा’ या मालिकेतील इंडियाज बेस्ट कुक स्पर्धेत सहभागी झालेल्या नाशिकच्या शुभमला जिंकवण्यासाठी नाशिककरांना त्यांच्या आवडत्या रेसिपीज पाठविण्याच्या आवाहनाला तुफान प्रतिसाद लाभला. त्यातून पल्लवी खुटाडे, सुवर्णा सावंत, संपदा गिते आणि प्रियांका गांधी यांनी अनुक्रमे द्वितीय, तृतीय, चतुर्थ आणि पाचवा क्रमांक पटकावत बाजी मारली. मात्र, या स्पर्धेतील विजेत्याबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

नाशिकच्या शुभमला स्पर्धेत जिंकवण्यासाठी लोकमत सखी मंचच्या वतीने ‘आवडीच्या रेसिपी स्पर्धे’चे आयोजन करण्यात आले होते. घरात राहूनदेखील राज्यस्तरावर झळकण्याची आणि आपली कला संपूर्ण महाराष्ट्राला दाखवण्याची ही संधी त्यातून नाशिककरांना उपलब्ध झाली होती. स्पर्धेत सहभाग नोंदविण्यासाठी शेकडो नाशिककरांनी त्यांच्या फेव्हरेट रेसिपीसमवेत स्वत:चा फोटो काढून तो पाठविला होता. त्यातून या स्पर्धेतील सहभागी विजेत्यांची निवड करण्यात आली आहे. त्यात पल्लवी खुटाडे यांनी सादर केलेल्या 'कडधान्य सब्जा कटलेट' या अनोख्या पाककृतीने दुसरा क्रमांक मिळवला. तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या सुवर्णा सावंत यांनी शेवेचे लाडू ही एक वेगळी पाककृती सादर केली. नाशिकच्याच स्वप्ना गिते यांनी क्विनो स्वीट पोटॅटो केक हा अनोखा पदार्थ बनवून चौथा तर प्रियांका गांधी यांनी मासवडी हा पदार्थ सादर करुन पाचव्या स्थानावर बाजी मारली. दरम्यान या स्पर्धेतील विजेत्यांपैकी दुसरे बक्षीस ३,५०० तर तिसरे बक्षीस २,००० आणि चौथ्या व पाचव्या क्रमांकासाठी प्रत्येकी प्रोत्साहनपर १,००० रुपयांचे पारितोषिक प्रदान केले जाणार आहे. दरम्यान, विजेत्यांमध्ये सुनीता चव्हाण, जान्हवी पैठणकर, विद्या लाहोटी, प्रांजली खटावकर, अर्चना डुंबरे, हेमांगी गोखले, कोमल गागधार, श्रद्धा सोमवंशी, अपर्णा नाईक, हर्षदा विसपुते यांनी बाजी मारली.

अनोखा वेबिनार रंगलाया स्पर्धेतील सहभागासाठी लोकमत सखी मंचच्या वतीने आयोजित ‘आवडीच्या रेसिपी स्पर्धे’चे बहारदार आयोजन करण्यात आले होते. तसेच नाशिकच्या नामवंत शेफ ओमसाई कुकींग क्लासेसच्या सीमा गवारे पाटील यांनी खास नाशिकची ओळख आणि नाशिककरांचा सर्वाधिक आवडता पदार्थ असलेल्या मिसळपावच्या पाककृतीचे सादरीकरण करीत खवय्या रसिकांची दाद मिळवली. त्याशिवाय या वेबिनारमध्ये नाशिकच्या वर्षा दंडगव्हाळ, रुपाली जाधव, मनिषा विंचूरकर, मीनाक्षी जाधव, वंदना महाजन यांनी विशेष स्लोगन सादर करुन शुभमला जिंकण्यासाठी शुभेच्छा दिल्या.तसेच नाशिकच्या प्रख्यात शेफ आरती कटारीया यांनीदेखील चोकोलावा पॅनाकोटा हे अनोखे डेझर्ट सादर केले. तसेच वेबिनारदरम्यान सेलिब्रिटी किर्ती आणि जीजीअक्का या कलाकारांशी गप्पाटप्पा रंगल्या. या कलाकारांनी मालिकेतील सर्व पात्रांची मनोवस्था उलगडून दाखवत मनमोकळ्या गप्पा मारल्याने रसिक प्रेक्षकांना त्यांच्याशी प्रत्यक्ष आपणच संवाद साधल्याचा आनंद मिळाला. प्रख्यात निवेदक जुई गडकरी यांनी अत्यंत प्रभावीपणे सूत्रसंचलन करत तसेच कलाकारांना बोलते करीत वेबिनारची रंगत खुलवली.

आज होणार अव्वल विजेत्याचे नाव जाहीरस्पर्धेतील प्रथम विजेत्याचे नाव आणि रेसिपी स्टार प्रवाहवर ‘फुलाला सुगंध मातीचा’ च्या १२ जूनला रात्री ८.३० वाजता होणाऱ्या एपिसोडदरम्यान प्रसारीत केले जाणार आहे. त्यामुळे शनिवारच्या या एपिसोडबाबत रसिक प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. तसेच स्पर्धेतील प्रथम विजेत्याला ५,००० रुपयांचे रोख बक्षीस तसेच स्टार प्रवाहवर झळकण्याची संधीदेखील मिळणार आहे. 

टॅग्स :Star Pravahस्टार प्रवाहJui Gadkariजुई गडकरीReceipeपाककृतीfoodअन्न