सिडको : महापालिकेच्या सिडको विभागाच्या वतीने दरवर्षी पावसाळा सुरू होण्याच्या आधी नागरी वस्तीतील नैसर्गिक नाले तसेच उघड्या गटारी साफ करण्याची मोहीम राबविण्यात येते. यंदाच्या वर्षीही मनपाने नालेसफाई केली असली तरी अजूनही बहुतांशी नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घाण व कचरा साचलेला असल्याने शनिवारपासून ही मोहीम पुन्हा राबविण्यास सुरुवात करण्यात आली असल्याचे मनपाच्या वतीने सांगण्यात आले आहे.सिडकोच्या मध्यवस्तीत असलेले उघडे नैसर्गिक नाले व पावसाळी गटारींची साफसफाई करण्यात आली असून, पावसाळा सुरू होण्याआधी नालेसफाईचे शहाणपण महापालिकेस आले असले तरी अजूनही बहुतांशी नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घाण व कचरा साचलेला असून, नाल्यांमध्ये गाळदेखील साचलेला दिसून येत आहे. याबाबत ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर मनपाच्या वतीने पुन्हा शनिवार (दि.१४) पासून नालेसफाईची मोहीम राबविण्यात सुरुवात करण्यात आली आहे. विभागीय अधिकारी अजित वाडेकर यांनी सकाळी आरोग्य व उद्यान विभागाची बैठक घेत कामकाजासंबंधी अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत. बहुतांशी नाले सिडकोच्या मध्यवस्तीतून जात असून, या नाल्यांमधील घाण व कचºयामुळे परिसरात दुर्गंधी पसरून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. मनपाच्या वतीने उघडे नैसर्गिक नाले हे दरवर्षी फक्त पावसाळ्याच्या आधी साफ करण्यात येत असले तरी हे नाले कायमस्वरूपी साफ करण्याची गरज असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. सिडकोच्या मध्यवस्तीतून जाणारे नाले तसेच अंबड गावालगतच्या नाल्यांची नियमित साफसफाई होणे गरजेचे असताना ते केवळ पावसाळा सुरू होण्याआधीच या नाल्यांची साफसफाई केली जात असल्याने मनपाने एकतर नागरी वस्तीतून जाणारे उघडे नैसर्गिक नाले कायमस्वरूपी साफ करावे अन्यथा ते बंदिस्त करण्याची अपेक्षाही नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. मनपाच्या वतीने दत्त चौक, पेलिकन पार्क, पंडितनगर, खांडे मळा येथील सिद्धिविनायक कॉलनी, अंबडगाव, कामटवाडे शाळेजवळील माउली लॉन्स, दातीर मळा आदी भागांतील नैसर्गिक उघडे नाले तसेच पावसाळी गटारी साफ करण्याची मोहीम पुन्हा राबविण्यास सुरुवात केली आहे.कारवाईचे आदेशवादळी वाºयासह झालेल्या पावसात सिडको भागात बहुतांशी मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांवर झाडांच्या फांद्या कोलमड्या असून, त्या रस्त्यातून बाजूला घेण्याची तसदी मनपाकडून घेतली गेली नसल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. याबाबत संबंधित विभागाच्या अधिकाºयांनी सिडको तसेच अंबड भागातील रस्त्यावर पडलेल्या झाडांच्या फांद्या हटविण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती सिडको प्रभाग सभापती हर्षा बडगुजर यांनी दिली.
महापालिकेला आले शहाणपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2019 11:00 PM
महापालिकेच्या सिडको विभागाच्या वतीने दरवर्षी पावसाळा सुरू होण्याच्या आधी नागरी वस्तीतील नैसर्गिक नाले तसेच उघड्या गटारी साफ करण्याची मोहीम राबविण्यात येते. यंदाच्या वर्षीही मनपाने नालेसफाई केली असली तरी अजूनही बहुतांशी नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घाण व कचरा साचलेला असल्याने शनिवारपासून ही मोहीम पुन्हा राबविण्यास सुरुवात करण्यात आली असल्याचे मनपाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
ठळक मुद्देसिडको विभाग । नालेसफाई कामाला वेग; अधिकाऱ्यांना दिल्या सूचना