लोकमत न्यूज नेटवर्कपिंपळगाव बसवंत : रशियातील किर्गिझस्तान विद्यापीठात वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेल्या महाराष्ट्रातील दोनशे तीन विद्यार्थ्यांना मायदेशी परतण्याची आस लागलेली आहे. आम्हाला मायदेशी परतण्यासाठी सहकार्य करावे, अशी हाक त्यांच्याकडून दिली जात आहे, मात्र मुंबईच्या विमानतळावर विमान उतरण्यासाठी शास्रज्ञांकडून परवानगीसाठी विलंब होत असल्याने पालकांचा जीव टांगणीला लागला आहे. दरम्यान, निफाड तालुक्याचे आमदार दिलीप बनकर यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह अन्य मंत्र्यांशी संपर्क साधून या विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.किर्गिझस्तान येथे वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांत पिंपळगाव येथील सोनिया विवेक पाटील, तृप्ती उत्तम शिंदे, सिद्धी हेमंत खैरनार, ऋतुराज कैलास शेवकर, अनिकेत सतीश बैरागी यांच्यासह परिसरातील दहा विद्यार्थी, तालुक्यातील २२, जिल्ह्यातील ९१ तर संपूर्ण महाराष्ट्रातील २०३ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. कोरोनामुळे जगभरात हवाई सीमा बंद करण्यात आल्या असून, संपूर्ण भारतात लॉकडाउन आहे. किर्गिझस्तान शहरात अन्नधान्य उपलब्ध होत नसल्याने बाहेरून आयात करावे लागते, परंतु तेदेखील लॉकडाउन काळात उपलब्ध न झाल्यास त्या विद्यार्थ्यांच्या खाण्या-पिण्याचा व आजारी पडल्यास औषधांचा तुटवडा निर्माण होऊन शेकडो विद्यार्थ्यांची गैरसोय होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे लवकरात लवकर त्यांना भारतात आणण्यासाठी पालकांनी सुरेशबाबा पाटील, आमदार बनकर, माजी आमदार अनिल कदम, सुप्रिया सुळे, नीलम गोºहे, आदित्य ठाकरे व रोहित पवार यांच्यामार्फत शासनाला साकडे घातले आहे.१ मे रोजी आम्हाला एमबीबीएसची डिग्री मिळणार आहे; परंतु याठिकाणी जगणेदेखील मुश्कील झाले आहे. अन्नाचा मोठा तुटवडा आहे तसेच आजारी पडलेल्या मुलांसाठी औषधेदेखील उपलब्ध नाहीत, मग आम्ही जगणार कसे? आमच्या डिग्रीचा काय उपयोग होणार? आम्ही जगलो तर अजून पदव्या मिळू शकतील त्यामुळे आम्हाला लवकरात लवकर मायदेशी परत न्यावे ही विनंती. - कल्पिता रसाळ, विद्यार्थिनीतेथील मुख्य शहर लॉकडाउन झाल्यामुळे खाण्या-पिण्याची गैरसोय व आरोग्य सुविधाही विद्यार्थ्यांना अपुºया पडत आहेत. त्यांना तातडीने मायदेशी घेऊन येण्यासाठी भारतीय प्रशासनाने व्यवस्था करावी. माझी पुतणी सोनिया पाटील दररोज व्हॉट्सअॅपद्वारे व्हिडीओ कॉलिंग करून जेवणाचे व तेथील परिस्थितीचे फोटो पाठवून विनवण्या करीत आहे. खूप मोठ्या संकटात ते सध्या आहेत. त्यामुळे शासनाने तातडीने पावले उचलून सहकार्य करणे अपेक्षित आहे.- नीलेश पाटील, पालक, पिंपळगाव बसवंत
मायदेशी परतण्यासाठी ‘त्या’ विद्यार्थ्यांचे आर्जव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2020 11:33 PM
लागलेली आहे. आम्हाला मायदेशी परतण्यासाठी सहकार्य करावे, अशी हाक त्यांच्याकडून दिली जात आहे, मात्र मुंबईच्या विमानतळावर विमान उतरण्यासाठी शास्रज्ञांकडून परवानगीसाठी विलंब होत असल्याने पालकांचा जीव टांगणीला लागला आहे.
ठळक मुद्देप्रशासनाला साकडे : रशियात अडकले २०३ विद्यार्थी; निफाडमधील २२ जणांचा समावेश