नगरसुल ; येवला तालुक्यातील ग्रामपंचायतींचा १५ वित्त आयोगाचे बँकांमध्ये खाते उघडण्याची प्रोसेस प्रशासनातर्फे सुरू आहे. अनेक गावांमध्ये ग्रामपंचायतीची खाते त्या त्या गावातील किंवा जवळ असलेल्या राष्ट्रीयीकृत बँकेत यापूर्वी उघडली आहे, मात्र सध्या शासनातर्फे १५ व्या वित्त आयोगाचे निधी ग्रामपंचायतीना वितरीत करण्यासाठी नवीन खाते उघडण्याच्या सूचना पंचायत समिती, येवला प्रशासन प्रशासनाकडून ग्रामपंचायतींना दिले आहेत. या संधीचा फायदा घेत येवला तालुक्यातील ग्रामपंचायतीचे खाते येवल्यातील देना बँक व बडोदा बँकेत उघडण्यात आले आहे. मात्र पूर्वी संबंधित ग्रामपंचायतीचे खाते ज्या बँकेत होते. त्या बँकांनी ह्या नवीन खाते उघडण्यास आक्षेप घेतला आहे.ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील सर्व ग्रामस्थांना बँक सेवा पुरवत असताना मलाईदार खाते मात्र इतर बँकांकडे पळविल्याने संबंधित बँक व ग्रामस्थांनी याला विरोध सुरू केला आहे.बँक आॅफ महाराष्ट्रच्या नगरसुल कार्यक्षेत्रातील दत्तक गावातील लोकांना सर्व प्रकारच्या खातेदारांना बॅँक सेवा पुरवते, त्यात झिरोबॅलन्स खातेदार, पिक कर्ज, शैक्षणिक कर्ज, निर्धार लोकांचे पगार, बचत खाते, प्रत्येक गावात थंमवर पैसे काढणे-टाकणे आदिंसह व्यवहाराची सुविधा आम्ही सर्व ग्रामपंचायतींना बॅँक सेवा पुरवतो, त्यामुळे सदर ठिकाणच्या ग्रामपंचायती खाते ह्या राष्ट्रकृत बँके ठेवावी हीच आमची भूमिका आहे.- सागर सोमासे, शाखा व्यवस्थापक, बँक आॅफ महाराष्ट्र, नगरसुल.पंधराव्या वित्त आयोगाचे खाते प्रत्येक ग्रामपंचायतीने आपापल्या सोयीनुसार जवळ असणाऱ्या राष्ट्रकृत बँकेत सुरू करण्याच्या सूचना सर्व ग्रामपंचायतींना देण्यात आल्या होत्या, मात्र हे सर्व खाते येवल्यात विशिष्ट बँकेतच असाव्यात असे निर्देश आम्ही दिलेच नाही.- डॉ. उमेश देशमुख, बिडीओ, येवला.