नाशिक : शहर व परिसरात दुचाकी, चारचाकी वाहन चोरीचे सत्र अद्यापही सुरूच आहे. नव्या वर्षात पोलिसांपुढे घरफोडी, सोनसाखळी चोरी, वाहनचोरीसारखे लहान-मोठे गुन्हे नियंत्रणात आणण्याचे आव्हान उभे राहिले आहे. २०१९ सालात तब्बल ४८० नाशिककरांची वाहने अज्ञात चोरट्यांनी गायब केली. मागील वर्षाच्या तुलनेत ८९ वाहने कमी चोरीला गेली असली तरी वाहनचोरीचे गुन्हेदेखील फारसे उघडकीस आलेले नाही. वर्षभरात केवळ १०२ वाहन चोरीच्या गुन्ह्यांची उकल पोलिसांना करता आली आहे.शहरातील सार्वजनिक ठिकाणी उभ्य केलेल्या वाहनांवर चोरट्यांचा डोळा कायम आहे. वाहनचोरी करणाऱ्यांची टोळी शहरात सक्रीय आहे. सार्वजनिक ठिकाणाहूंन वाहने गायब करण्याबरोबरच राहत्या घरांच्या वाहनतळांमधूनसुध्दा वाहने चोरून नेण्यापर्यंत चोरट्यांची मजल पोहचली आहे. २०१८ साली ५६९ लहान-मोठी वाहने चोरट्यांनी गायब केली होती. त्यापैकी १५५ वाहनचोरीचे गुन्हे पोलिसांनी उघडकीस आणले होते. २०१९मध्ये चोरट्यांनी ४८० वाहनांवर डल्ला मारला. त्यापैकी केवळ १०२ वाहनचोरीचे गुन्हे उघड करता आले. त्यामुळे वाहनचोरीच्या गुन्ह्यांच्या उकलची टक्केवारी केवळ २१ राहिली. २०१८ साली २७ टक्क्यांपर्यंत वाहनचोरीचे गुन्ह्यांचे उकलचे प्रमाण होते.मोटारचोरीच्या गुन्ह्यांत १६ टक्क्यांनी घट झाल्याचा दावा पोलीस आयुक्तालयाकडून एकीकडे केला जात असला तरी दुसरीकडे गुन्ह्यांच्या उकलचे प्रमाणही घटल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. नाशिककरांची वाहने राहत्या घरापासून सार्वजनिक ठिकाणांपर्यंत सुरक्षित नसल्याने संताप व्यक्त होत आहे. वाहनचोरीच्या वाढत्या घटनांमुळे नाशिककर आश्चर्यचकित झाले आहे. वाहनांच्या सुरक्षेबरोबरच बंद घरांच्या सुरक्षेचाही प्रश्न चव्हाट्यावर आला आहे. बुधवारी (दि.१) पेठरोडवरून ओमाराम रामाराम पटेल (३२) यांची अल्टो कार (एम.एच.१५ एएस २२७६) अज्ञात चोरट्यांनी एका रूग्णलायापासून पळवून नेली. काठेगल्लीमधील पाटीदार भवनाजवळ असलेल्या हिमको सोसायटीच्या वाहनतळातून दुचाकी (एम.एच१५ बीआर २८३५)चोरट्यांनी पळवून नेली. तसेच तीन ते चार दिवसांपुर्वी दत्ता लक्ष्मण नाटकर (६०) या ज्येष्ठाच्या मालकीची रिक्षा (एम.एच१५ ईएच ३४९०) अज्ञात चोरट्यांनी पंचवटी कारंजा परिसरातील येवलेकर चाळीतील त्यांच्या राहत्या घरासमोरून चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला.
३६५ दिवसांत नाशिककरांची ४८० वाहने गेली चोरीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2020 4:26 PM
२०१८ साली ५६९ लहान-मोठी वाहने चोरट्यांनी गायब केली होती. त्यापैकी १५५ वाहनचोरीचे गुन्हे पोलिसांनी उघडकीस आणले होते. २०१९मध्ये चोरट्यांनी ४८० वाहनांवर डल्ला मारला. त्यापैकी केवळ १०२ वाहनचोरीचे गुन्हे उघड करता आले.
ठळक मुद्दे२०१८ साली ५६९ लहान-मोठी वाहने चोरट्यांनी गायब केली १०२ वाहनचोरीचे गुन्हे उघड करता आले