नाशिक : मुळ बिहारची असलेली पिडित महिला भाडेतत्त्वावर सिडको परिसरातील आश्विननगर येथे २०१० साली राहत होती. १० सप्टेंबर २०१० साली पिडितेचा घरमालकाने विनयभंग केल्याची घटना घडली होती. तेव्हापासून हा खटला प्रलंबित होता; मात्र न्यायालयाच्या पटलावर खटला येताच अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी बी.के.गावंडे यांनी अवघ्या २० दिवसांतच सुनावणी पुर्ण केली. आरोपी निकेश कांतीलाल शहा (५५,रा.आश्विननगर) यास ३ महिने कारावास आणि १ हजाराचा दंड अशी शिक्षा सोमवारी (दि.९) सुनावली. सुरूवातीपासूनच या गुन्ह्यात पोलिसांकडून चालढकल केली गेली; मात्र पिडितेने जिद्दीने पाठपुरावा केल्याने यश आल्याचे सरकारी अभियोक्त्यांनी सांगितले.बिहारच्या एका ३४वर्षीय महिला भाडेतत्वावर राहत असलेल्या इमारतीत वीजपुरवठा सुरू करण्यासाठी गेली होती. यावेळी निकेश शहा याने पिडितेला जवळ घेत विनयभंग केला. यामुळे पिडीत महिलेने तत्काळ पतीसह अंबड पोलीस ठाणे गाठले होते; मात्र त्यावेळी शहा विरोधात अर्ज घेण्यास पोलिसांनी नकार देत गुन्हा दाखल केला नव्हता. त्यामुळे पिडीतेने थेट तत्कालीन उपआयुक्त डॉ. डी.एस.स्वामी, आयुक्त कुलवंतकुमार सरंगल यांच्याकडे तक्र ार अर्ज केला. यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, न्यायालयात हा खटला प्रलंबित होता. तसेच पिडीता देखील बिहार येथील मुळ गावी राहण्यास निघून गेली. न्यायालयात या प्रकरणाचे कामकाज १९ नोव्हेंबर पासून सुरु झाले. सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी अभियोक्ता विद्या देवरे-निकम यांनी कामकाज पाहिले. त्यात शहा विरोधात ठोस पुरावे आढळून आले. तसेच आरोपी शहा यांनी वयाचे आणि आजाराचे कारण देत शिक्षेत सुट देण्याची विनंती न्यायालयात केली. मात्र हा गुन्हा मिहलेविरोधातील अत्याचाराच्या प्रयत्नाचा असल्याने आरोपीवर दया दाखविल्यास समाजात चुकीचा संदेश जाईल व महिलांचे मनाधैर्य खचण्यास भर पडेल या विचाराने न्यायालयाने आरोपीने केलेली शिक्षेत सूट मिळण्याची विनंती फेटाळून लावल्याचे देवरे-निकम यांनी सांगितले.पोलिसांचा गलथानपणा उघडतत्कालीन आयुक्तांच्या आदेशानंतरदेखील ठाणे अंमलदारांनी गुन्हा नोंदविण्याऐवजी अदखलपात्र नोंद केली होती.‘कायद्यावर विश्वास असून न्याय मिळेलच’ या जिद्दीने चिकाटीने पिडीत महिलेने पाठपुरावा सुरूच ठेवला. तीन महिन्यानंतर शहा विरोधात विनयभंगाचा गुन्हा अंबड पोालीस नोंदविला; मात्र गुन्ह्याचा तपास करताना तत्कालीन हवालदार बी. के. शेळके यांनीचुकीचा पंचनामा करत न्यायालयात सादर केला. जेव्हा ही बाब लक्षात आल्यानंतर पिडीतेने पुन्हा दाद मागितली. पोलिसांनी चौकशी करून त्यात तथ्य आढळल्याने शेळके यांना १हजार रु पयांचा दंडदेखील ठोठावला होता.
...अवघ्या २० दिवसांतच न्यायालयाने केला विनयभंग करणाऱ्याचा ‘फैसला’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2019 8:00 PM
तत्कालीन आयुक्तांच्या आदेशानंतरदेखील ठाणे अंमलदारांनी गुन्हा नोंदविण्याऐवजी अदखलपात्र नोंद केली होती.‘कायद्यावर विश्वास असून न्याय मिळेलच’ या जिद्दीने चिकाटीने पिडीत महिलेने पाठपुरावा सुरूच ठेवला.
ठळक मुद्देन्यायालयात या प्रकरणाचे कामकाज १९ नोव्हेंबर पासून सुरु सुरूवातीपासूनच या गुन्ह्यात पोलिसांकडून चालढकल