संजय शहाणेइंदिरानगर - ‘व्हाइटनर गॅँग’मधील अल्पवयीन मुलांना या नशेतून आणि त्यांच्याकडून होत असलेल्या गुन्हेगारीतून कसे बाहेर काढावे असा प्रश्न निर्माण झाला आहे. वडाळा गाव आणि राजीवनगर झोपट्टीतील व्हाइटनर गँगच्या दहशतीमुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेवडाळा गावातील सावित्रीबाई फुले झोपडपट्टी पिंगुळी बाग अण्णा भाऊ साठे नगर मेहबूबनगर यासह परिसरात आणि राजीवनगर झोपडपट्टी परिसरात व्हाइटनर गँगमध्ये अल्पवयीन मुलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग आहे. दोन्ही ठिकाणी झोपडपट्टी परिसर असल्याने उदरनिर्वाहासाठी हातावर काम करण्याची लोकवस्ती म्हणून ओळखी जाते परंतु आई वडील सकाळी मोलमजुरीसाठी घराबाहेर निघून गेल्यानंतर लहान मुलेच घरात एकटी असतात. याचाच फायदा काही गुन्हेगारी प्रवृतीच्या लोकांनी घेऊन मुलांना व्हाइटनर सारख्या नशेच्या सवयी लावल्या आहेत. या मुलांचा गुन्हेगारीसाठी वापर करण्यास मोठ्या प्रमाणात सुरवात केल्याचे निदर्शनात आले आहेपरिसरातील झोपडपट्टीतील अल्पवयीन मुले व्हाईटनरची नशा केल्यानंतर त्यांना कोणत्याही प्रकारची शुद्ध नसते. त्यामुळे त्यांना गुन्हेगारी प्रवृतीचे लोकांनी जे सांगितले ते करण्यास राजी होत आहेत. त्यामुळे परिसरात भुरट्या चोर्या आणि घरफोडीच्या घटना नियमति घडत आहेत. ही मुले रस्त्याने ये जा करताना लहान मुली, युवती व महिलांची छेडछाड करत आहेत. त्यामुळे परिसरात व्हाइटनर गँगची दहशत दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. व्हाईटनर नशा करणाºया अल्पवयीन मुलांच्या आरोग्यावरही परिणाम होत आहे. त्यांचा कायम स्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. व्हाइटनर गँगच्या अल्पवयीन मुलांना गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक व्हाइटनर कोठून आणून देता हा सुद्धा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण स्टेश्नरी दुकानांमधुन व्हाइटनर सहजासहजी विक्र ी केले जात नाही. त्यामुळे ही मुले ते कुठून मिळवतात असा प्रश्न निर्माण झाला आहे. अल्पवयीन मुले असल्याने पोलिसांना फार कडक भूमिका घेता येत नाही. व्यसन करुन गुन्हा केलेल्यास रंगेहात पकडल्यावर पोलिसांना त्यांचा ताबा रिमांड होमकडे द्यावा लागते. त्या ठिकाणी सदर मुलाचे पालक बॉन्ड लिहून त्यांना सोडून घेतात. पुन्हा सदर मुले परिसरात कृत्य करण्यास मोकळे होतात.
नाशिकमध्ये व्हाईटनरच्या नशेतुन गुन्हेगारीत वाढ; मुलांकडून घडत आहेत सराईत चोºया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2017 4:37 PM