शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

पंचवटी पोलीस ठाण्यासमोर महिलेने स्वत:ला पेटविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2020 12:20 AM

आपल्या इच्छेविरुद्ध विवाह लावून दिल्याचा आरोप करत अवघ्या आठवडाभरातच पतीच्या जाचाला कंटाळून घर सोडणारी मुलगी माहेरी व सासरी जात नाही, म्हणून नैराश्यापोटी तिच्या आईने पंचवटी पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वारावरच रॉकेल ओतून घेत स्वत:ला पेटवून घेतल्याची घटना सोमवारी (दि.१०) संध्याकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देप्रकृती चिंताजनक : मुलगी सासरी जात नसल्याने केले कृत्य; जिल्हा रुग्णालयाच्या जळीत कक्षात उपचारार्थ दाखल

नाशिक : आपल्या इच्छेविरुद्ध विवाह लावून दिल्याचा आरोप करत अवघ्या आठवडाभरातच पतीच्या जाचाला कंटाळून घर सोडणारी मुलगी माहेरी व सासरी जात नाही, म्हणून नैराश्यापोटी तिच्या आईने पंचवटी पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वारावरच रॉकेल ओतून घेत स्वत:ला पेटवून घेतल्याची घटना सोमवारी (दि.१०) संध्याकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली.याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, मुलीचे वडील अमरितसिंग यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात येऊन ‘माझी मुलगी रायपूर येथून बेपत्ता झाली असून, ती नाशिकला तिच्या मैत्रिणीकडे राहते, तिला पोलीस स्टेशनला बोलावून घ्या व तिचे म्हणणे जाणून तसे लेखी लिहून घ्या’ असे सांगिंतले. त्यामुळे पोलिसांनी तिला तिच्या पालकांसमक्ष चौकशीकरिता बोलावून घेतले होते. संध्याकाळी ५ वाजेच्या सुमारास ती आपल्या मैत्रिणीसोबत आली. यावेळी तिने सासरी व माहेरी जाण्यास नकार देत दोन्ही ठिकाणाहून मला त्रास आहे, मी सक्षम असून मला कोणीही बळजबरी करू शकत नाही. मी माझ्या जबाबदारीवर मैत्रिणीकडे राहायला जात असल्याचे पोलिसांना लेखी दिले.त्यानंतर पंचवटी पोलीस ठाण्यातून बाहेर पडताना प्रवेशद्वारावर आवारात मुलीची आई हरजिंदर अमरितसिंग संधू (५५, रा. कृष्णनगर, पंचवटी) यांनी स्वत:च्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांच्यासोबत असलेल्या त्यांच्या नातेवाइकांच्या ही बाब लक्षात येताच तत्काळ अंगावरील शर्ट काढून पेटलेल्या हरजिंदर यांना विझविण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनीही त्यांच्या दिशेने मदतीसाठी धाव घेतली. हरजिंदर यांना तत्काळ चारचाकी वाहनातून जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर जळीत कक्षात उपचार सुरू असून, प्रकृती चिंताजनक असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.दरम्यान, १८ जानेवारी २०२० रोजी हरजिंदर यांच्या मुलीचा विवाह झाला होता. मुलीने दोन दिवसांपूर्वी रायपूरवरून नाशिक गाठले. ती गंजमाळ येथील मैत्रिणीच्या घरी राहत होती. पोलिसांनी जबाब नोंदवून झाल्यानंतर बाहेर पडताना आलेल्या नैराश्यापोटी पोलीस ठाण्याच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ हरजिंदर यांनी अंगावर पेट्रोल ओतून स्वत:ला पेटवून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.दुचाकीच्या डिक्कीत पेट्रोलची बाटलीपोलीस ठाण्यातून बाहेर पडताना प्रवेशद्वाराजवळच हरजिंदर यांनी स्वत:च्या अ‍ॅक्टिवाच्या डिक्कीमधून पेट्रोलने भरलेली बाटली काढली. कोणाला काही समजण्याच्या आतच त्यांनी पेट्रोल अंगावर ओतून घेत स्वत:ला पेटवून घेतले. यावेळी त्यांचे पती, भाऊ, चुलते व परिसरातील नागरिकांनी धावत जाऊन त्यांना विझविले.४या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत पंचवटी पोलीस ठाण्यात नोंद करण्याचे काम सुरू होते. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. अत्यवस्थेत त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी