सटाणा : दुचाकीवरून तोल गेल्याने झालेल्या अपघातात पत्नी जागीच ठार झाली तर पती किरकोळ जखमी झाला. ही घटना गुरुवारी (दि.१०) दुपारी पावणे तीन वाजेच्या सुमारास ताहाराबाद वीज उपकेंद्रानजीक घडली. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
ताहाराबाद येथील सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत मानकर हे पत्नी मीनाक्षी (४७) यांना घेऊन सोमपूर येथे लेकीकडे पुरणपोळीच्या जेवणासाठी गेले होते. दुपारी पावणे तीन वाजता जेवण करून ताहाराबादकडे परतीच्या मार्गावर असताना वीज उपकेंद्रनजीक चालत्या दुचाकीवरून मीनाक्षी यांचा अचानक तोल जाऊन डांबरी रस्त्यावर कोसळल्या. त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांना तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. याप्रकरणी जायखेडा पोलिसांनी घटनेची नोंद केली आहे. दरम्यान नामपूर येथे शवविच्छेदन करून सायंकाळी उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले. (१० मीनाक्षी मानकर)
===Photopath===
100621\10nsk_25_10062021_13.jpg
===Caption===
१० मिनाक्षी मानकर