नाशिक : नाशिकरोड येथील वीर सावरकर उड्डाणपूलावरून भरधाव जाणाऱ्या मारूती अल्टो कारने समोर चालत असलेल्या दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीवर आपल्या पतीच्या पाठीमागे बसलेली महिला ठार झाली तर त्यांच्या पतीलाही गंभीर दुखापत झाल्याची घटना रविवारी (दि.१७) दुपारच्या सुमारास घडली.याबाबत नाशिकरोड पोलिसांनी दिलेली माहिती अशी, नाशिकरोड येथील उड्डाणपूलावरून सिन्नरफाट्याच्या दिशेने दुचाकीवरून बीवायके वाणिज्य महाविद्यालयाचे प्राध्यापक प्रसाद लक्ष्मण पागधरे हे त्यांच्या पत्नी नीता पागधरे यांना सोबत घेऊन मार्गस्थ होत होते. याचवेळी त्यांच्या पाठीमागून सिन्नरच्या दिशेने धावणा-या एका अज्ञात अल्टोकारचालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत दुचाकीला कारने धडक दिली. या धडकेत पागधरे दाम्पत्य खाली कोसळले. धडक इतकी भीषण होती की, हे पती-पत्नी उड्डाणपूलावरून खाली जुना ओढा रस्त्यावर पडले. दरम्यान, नीता यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे बिटको रूग्णालयातील वैद्यकिय सुत्रांनी सांगितले. तसेच त्यांचे पती प्रसाद हेदेखील गंभीररित्या जखमी झाले असून त्यांना खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या अपघातानंतरअपघातस्थळावर न थांबता कारचालक नाशिक-पुणे महामार्गावरून भरधावरित्या फरार झाला आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात त्याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्या कारचालकाचा शोध घेत होते, दरम्यान, कार पोलिसांना देवळाली कॅम्पकडे जाणाºया लॅमरोडवरील एका नाल्याजवळ आढळून आली आहे.
नाशिकरोड उड्डाणपूलावर कारच्या धडकेत महिला ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2020 4:36 PM
सिन्नरच्या दिशेने धावणा-या एका अज्ञात अल्टोकारचालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत दुचाकीला कारने धडक दिली. या धडकेत पागधरे दाम्पत्य खाली कोसळले.
ठळक मुद्देपती-पत्नी उड्डाणपूलावरून खाली जुना ओढा रस्त्यावर पडले.