नाशिक : मुंबई येथील एका संशयिताने वडाळागावातील झीनतनगर परिसरात राहणाऱ्या शबाना वसीम शेख (३०) या महिलेला फ्लॅट खरेदी करून देण्याच्या नावाखाली ३ लाख २० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी शबाना यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, या फिर्यादीनुसार संशयित महेबूब खान (५३, रा. मुंब्रा, ठाणे) याने त्यांना एक फ्लॅट दाखविले. त्या फ्लॅटचा व्यवहार करण्याहेतू बिल्डरसोबत भेट घालून विसार म्हणून शबाना यांच्याकडून पाच लाख रुपयांचा धनादेश स्वीकारल्याचे फिर्यादित म्हटले आहे. हा धनादेश बॅँकेत वटला नाही, म्हणून संशयित खान याने पुन्हा या महिलेकडून तीन लाख २० हजार रुपयांची मागणी करून ते स्वीकारले. त्यानंतर वारंवार फिर्यादी महिला व त्यांचे पती वसीम यांनी संशयिताक डे दिलेल्या रकमेची मागणी केलीशहरात दुचाकी चोरीचे सत्र सुरूचनाशिक : शहर व परिसरामध्ये दुचाकीचोरीचे सत्र सुरूच असून, सातपूर, इंदिरानगर भागातून चोरट्यांनी अनंत चतुर्दशीला दोन दुचाकी लंपास केल्याची घटना घडली.शास्त्रीनगर येथील रहिवासी माधव भास्कर गाडगीळ (७५) यांची दुचाकी त्यांच्या बंगल्यासमोरून चोरट्यांनी पळवून नेली. तसेच सातपूर भागात प्रदीप दुलाजी खंदारे या युवकाची दुचाकी चोरट्याने त्याच्या श्रमिकनगर येथील घरासमोरून गायब केली.केल्याची फिर्याद पोलीस ठाण्यात दिली आहे.याप्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहेत.
फ्लॅटच्या नावाखाली महिलेला गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2019 1:05 AM
मुंबई येथील एका संशयिताने वडाळागावातील झीनतनगर परिसरात राहणाऱ्या शबाना वसीम शेख (३०) या महिलेला फ्लॅट खरेदी करून देण्याच्या नावाखाली ३ लाख २० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
ठळक मुद्देतीन लाखांची फसवणूक । संशयिताविरुद्ध गुन्हा