लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : सातपूर पोलीस ठाणे हद्दीत धर्माजी कॉलनी भागात घंटागाडी कर्मचाऱ्याने एका महिलेचा विनयभंग केल्याची घटना घडली. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्षय नरवणकर असे संशयित घंटागाडी कामगाराचे नाव आहे. पीडित महिलेनी याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. पीडित महिला घंटागाडीत कचरा टाकण्यासाठी गेली असता संशयित अक्षय याने तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत वेळोवेळी तिचा पाठलागही केला. रविवारी (दि.२८) सकाळी पीडित महिला नेहमीप्रमाणे घंटागाडीत कचरा टाकण्यासाठी आली असता संशयित अक्षय याने तिचा हात पकडून धमकी देत विनयभंग केल्याचे फिर्यादीत पीडितेने म्हटले आहे.अपघातात दुचाकीस्वार ठारनाशिक : भरधाव अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत साठ वर्षीय दुचाकीस्वार ठार झाला. हा अपघात महामार्गावरील हॉटेल एक्स्प्रेस इनसमोर झाला.याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. शिवराम बळवंत ठुबे (६०, रा. लॅमरोड, देवळाली कॅम्प) असे या अपघातात मृत्यू झालेल्यावृद्धाचे नाव आहे. ठुबे रविवारी (दि.२८) संध्याकाळच्यासुमारास आपल्या दुचाकीवर विल्होळी येथून नाशिकच्या दिशेने प्रवास करत होते. यावेळी हॉटेल एक्स्प्रेस इन जवळच्या पेट्रोलपंपासमोर भरधाव जाणाºया एका अज्ञात वाहनाने ठुबे यांच्या दुचाकीस धडक दिली. या अपघातात ठुबे गंभीर जखमी झाले होते. त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असता उपचारादम्यान त्यांचा मृत्यू झाला.कर्जवसुलीसाठी आलेल्या इसमाकडून विनयभंगनाशिक : कर्जाची वसुली करण्यासाठी ग्राहकाच्या घरी पोहचलेल्या एका फायनान्स कंपनीच्या वसुली कर्मचाºयाने पीडित महिलेला अर्वाच्च भाषा वापरून गैरवर्तन करत शिवीगाळ करून विनयभंग केल्याचा प्रकार सातपूर औद्योगिक वसाहतीतील सोमेश्वर कॉलनीत घडला. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेच्या घरी अक्षय जगताप व त्याच्या सोबतचे तीन साथीदारांनी मिळून विनयभंग केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घंटागाडी कामगाराकडून महिलेचा विनयभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2020 11:36 PM
नाशिक : सातपूर पोलीस ठाणे हद्दीत धर्माजी कॉलनी भागात घंटागाडी कर्मचाऱ्याने एका महिलेचा विनयभंग केल्याची घटना घडली. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठळक मुद्देहात पकडून धमकी देत विनयभंग