सिन्नर : तालुक्यातील पाथरे खुर्द येथील ७४ वर्षांच्या आजोबांसह नाशिकच्या भाभानगरातून कोरोनाच्या उपचारांसाठी सिन्नरच्या ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात दाखल झालेल्या महिलेने कोरोनावर मात केली असून, त्यांना आनंदमय वातावरणात निरोप देण्यात आला. एकीकडे कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना आरोग्य विभागाच्या प्रयत्नांतून रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतत असल्याने कोरोनाच्या संकटातही तालुकावासीयांसाठी ही दिलासादायक बाब ठरत आहे.तालुुक्यातील पाथरे खुर्द येथील ७४ वर्षीय ज्येष्ठ नागरिकास मूत्र मार्गाचा विकार बळावल्याने उपचारार्थ कोपरगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मूत्र मार्ग विकाराची छोटीशी शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याने सोमवारी (दि.८) कोविड-१९ तपासणीसाठी त्यांच्या घशातील स्वॅबचे नमुने घेण्यात आले होते.तहसीलदार राहुल कोताडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन बच्छाव, अधीक्षक डॉ. निर्मला गायकवाड, नोडल अधिकारी डॉ. लहू पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत खैरनार, डॉ. सुशील पवार आदींसह आरोग्य कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत त्यांना आनंदमय वातावरणात निरोप देण्यात आला.वेळेवर उपचारतपासणी अहवालात या आजोबांना कोरोनाची लागण झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे या आजोबांना सिन्नरच्या ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. तर याच सुमारास नाशिक येथील भाभानगरमध्ये वास्तव्यास असलेल्या महिलेला कोरोनाची लागण झाल्याने त्यादेखील उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल झाल्या होत्या. वेळच्या वेळी आहार, योग्य उपचार, डॉक्टरांचे मार्गदर्शन याची काटेकोर अंमलबजावणी केल्याने त्यांनी कोरोनावर मात केली.
पाथरेतील ज्येष्ठासह नाशिकची महिला झाली कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2020 10:37 PM
सिन्नर : तालुक्यातील पाथरे खुर्द येथील ७४ वर्षांच्या आजोबांसह नाशिकच्या भाभानगरातून कोरोनाच्या उपचारांसाठी सिन्नरच्या ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात दाखल झालेल्या महिलेने कोरोनावर मात केली असून, त्यांना आनंदमय वातावरणात निरोप देण्यात आला. एकीकडे कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना आरोग्य विभागाच्या प्रयत्नांतून रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतत असल्याने कोरोनाच्या संकटातही तालुकावासीयांसाठी ही दिलासादायक बाब ठरत आहे.
ठळक मुद्देदोघांना निरोप: सिन्नर तालुकावासियांसाठी दिलासादायक बाब; आरोग्य विभागाच्या यंत्रणेकडून शर्थीचे प्रयत्न