सिडको : प्रसूतिकळा आलेल्या महिलेला सिडकोतील मोरवाडी येथील महापालिकेच्या श्री समर्थ हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी प्रसूतीसाठी दाखल करून घेण्यास नकार दिल्यामुळे महिला आपल्या पतीसह पायीच घरी निघाली असता, वाटेतच तिची प्रसूती झाली.सिडकोतील खुटवडनगर येथे राहणाऱ्या महिलेस गुरुवारी दुपारी प्रसूतिकळा येऊ लागल्यामुळे पतीसह ही महिला मोरवाडीतील महापालिकेच्या श्री समर्थ हॉस्पिटलमध्ये गेली असता, तेथील कर्मचारी, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी महिलेला दाखल करून घेण्यास नकार दिला, असे या महिलेच्या नातेवाइकांनी सांगितले.रुग्णालयाने नकार दिल्यामुळे घराकडे परत निघालेली ही महिला प्रसूतिकळा असह्य झाल्याने भोवळ येऊन रस्त्यात पडली. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक नगरसेवक व महिलांनी धावपळ करून रस्त्याच्या कडेलाच महिलेची प्रसूती केली. महापालिकेच्या अनास्थेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.४राज्यात सर्वत्र आरोग्य विभागाचा कारभाराबद्दल चर्चा सुरू असताना सिडकोमध्येदेखील मनपाच्या आरोग्य विभागाची अनास्था उघडकीस आली असून, यापूर्वीदेखील मनपाच्या एका हॉस्पिटलमध्ये महिला प्रसूतीसाठी अॅडमिट न करून घेतल्याने या महिलेने रिक्षामध्येच बाळाला जन्म दिला होता. महिलेच्या प्रसूतीनंतर पुन्हा मोरवाडीच्या रुग्णालयाशी संपर्क साधला असता, त्यांनी रुग्णवाहिका पाठवून बाळ व बाळंतिणीस रुग्णालयात दाखल करून घेतले.रुग्णालयातून ही महिला पतीसह परतत असताना रस्त्यातच तिला कळा असह्य झाल्या. त्यामुळे रस्त्याच्या कडेला भोवळ येऊन पडताच आजूबाजूच्या नागरिकांनी व महिलांनी धाव घेत मदतीचा हात पुढे केला.नगरसेवक भाग्यश्री ढोमसे, सुनीता भुजबळ, नलिनी क्षीरसागर, रंजना कुलकर्णी, भदाणे, अहिरे, चकोर, सूर्यवंशी या महिलांनी पुढे येत रस्त्यावर तिची प्रसूती केली. या महिलेने एक स्री जातीच्या अर्भकास जन्म दिला.
रुग्णालयाने नकार दिल्याने रस्त्यातच महिलेची प्रसूती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2020 1:21 AM
प्रसूतिकळा आलेल्या महिलेला सिडकोतील मोरवाडी येथील महापालिकेच्या श्री समर्थ हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी प्रसूतीसाठी दाखल करून घेण्यास नकार दिल्यामुळे महिला आपल्या पतीसह पायीच घरी निघाली असता, वाटेतच तिची प्रसूती झाली.
ठळक मुद्देसिडकोतील प्रकार : प्रसूतीनंतर रुग्णालयात केले दाखल; बाळ-बाळंतीण सुखरूप; नागरिकांमध्ये तीव्र संताप