त्र्यंबकेश्वर : तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून पाणीटंचाईची झळ बसू लागली असून, हंडाभर पाण्यासाठी महिलांची रानोमाळ भटकंती सुरू असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. असे असले तरी टंचाईग्रस्त ग्रामपंचायतींकडून अद्याप एकही प्रस्ताव दाखल झालेला नाही, हे विशेष !वाढत्या तापमानाचा फटका त्र्यंबकेश्वर तालुक्याला दिवसेंदिवस बसू लागला आहे. पारा ३६ ते ३८ डिग्री सेल्सिअसपर्यंत वाढत आहे. परिणामी उन्हाचा दाह वाढत असून, जलाशयाचे प्रमाण झपाट्याने कमी होत आहे. तालुक्यात १० ते १२ ल.पा. बंधारे असून, योग्य नियोजन केले तर तालुक्याला पिण्याचे पाणी मिळू शकेल. याशिवाय सरकारी ग्रामपंचायतीच्या तसेच खासगी विहिरींचे पाणीही कमी पडत आहे. तथापि काही दुर्गम भागात पाणी पोहोचत नाही, अशी गावे, वाड्या-पाडे मात्र पाण्याविना वंचित राहतात. वाढत्या उन्हामुळे बहुतेक पाण्याचे स्रोत कमी होत आहेत. तालुक्याला एप्रिल, मे आणि अर्धा जून या महिन्यांत अर्थात पाऊस पडला ठीकच नाही तर पूर्ण जून महिनाही पाणीटंचाईचा सामना करावा लागतो.नेहमीची पाणीटंचाई तालुक्याच्या पाचवीलाच पूजलेली आहे. बेरोजगारी, स्थलांतर रोखण्यासाठी त्र्यंबक तालुक्यात सन २०१३-१४मध्ये गडदुणे व बोरीपाडा प्रकल्प मंजूर करण्यात आले होते. एवढेच नव्हे तर या प्रकल्पासोबतच स्थानिक स्तरामार्फत होणारे कळमुस्ते, खोरीपाडा, वरसविहीर, राऊतमाळ, खडकओहळ व टाके देवगाव याबरोबरच ब्राह्मणवाडे, पिंप्री शिरसगाव शिवारातील किकवी हा महत्त्वाकांक्षी प्रकल्पालादेखील थेट दिल्लीपर्यंत मंजुरी मिळाली आहे. सध्या हा प्रकल्प नांदूरमधमेश्वर विभागाकडे आहे. येथील प्रकल्प-देखील मंजूर करण्यात आले होते. तसे पाहता वरील सर्व प्रकल्प पूर्ण झाले तर त्र्यंबकेश्वर तालुका सुजलाम् सुफलाम् झाल्याशिवाय राहणार नाही. यामुळे तालुक्यात भासणारी नेहमीची पाणीटंचाई तर दूर होईलच; पण कामे सुरू झालीच तर तालुक्यातील पाणीटंचाई दूर होईल.तालुक्यात ना औद्योगिक विकास वसाहत, ना उद्योग धंद्याला चालना. परिणामी दरवर्षी हजारो मजुरांचे रोजगारासाठी स्थलांतर होत असते. पूर्व भागातील द्राक्षमळे, गिरणारे, नाशिक गंगाघाट, सातपूर तर काही मजूर गुजरातला जातात. तसेच त्र्यंबकेश्वर आदी भागात हे लोक तीन महिने वास्तव्य करून परत आपापल्या गावी परत जातात. त्र्यंबकेश्वर शहराला पाणीपुरवठा करणारे अंबोली, बेझे धरणातील पाणी उन्हामुळे कमी झाल्याने दिवसाआड पाणी सोडण्याची वेळ दरवर्षी त्र्यंबक नगर परिषदेवर आली आहे.प्रकल्पांचे भिजत घोंगडेत्र्यंबकेश्वर तालुक्यातील काही अपूर्ण प्रकल्प पूर्णत्वाला गेली तरच बेरोजगारांना कामे मिळतील. स्थलांतराला आळा बसेल व महत्त्वाचे म्हणजे या नवीन प्रकल्पांमुळे प्यायला पाणी मिळेल. पाच ते सहा हजार कृषिक्षेत्र ओलिताखाली येऊ शकेल, अथवा या प्रकल्पांचेही भिजत घोंगडे पडले तर त्र्यंबकेश्वर तालुक्यात दरवर्षी पाणीटंचाईशी सामना करावा लागेल. तालुक्यात सध्या टंचाई परिस्थिती नाही. विशेष म्हणजे या तालुक्यात बळीराजा मुबलक प्रमाणात चाऱ्याचा स्टॉक करून ठेवत असल्याने चाराटंचाई भासत नाही. सर्व यंत्रणांची ११९ कामे व ६७५ मजूर काम करीत असल्याने रोजगाराचा प्रश्न सध्या तरी भेडसावत नाही. अर्थात स्थलांतर होत असले तरी पावसाळ्यात खरिपासाठी दोन पैसे मिळावेत, म्हणूनही स्थलांतर होत असावे.- तहसीलदार कार्यालय, त्र्यंबकेश्वर
हंडाभर पाण्यासाठी महिलांची रानोमाळ भटकंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 11:18 PM
त्र्यंबकेश्वर : तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून पाणीटंचाईची झळ बसू लागली असून, हंडाभर पाण्यासाठी महिलांची रानोमाळ भटकंती सुरू असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. असे असले तरी टंचाईग्रस्त ग्रामपंचायतींकडून अद्याप एकही प्रस्ताव दाखल झालेला नाही, हे विशेष !
ठळक मुद्देत्र्यंबकला दिवसाआड पाणीपुरवठा : रोजगाराअभावी तालुक्यातून मजुरांचे स्थलांतर