देवळा : येथील विंचूर प्रकाशा महामार्गावर जिल्हा ग्रामीण वाहतुक शाखेच्या पोलिसांनी गाडी अडवली म्हणून मालेगाव तालुक्यातील शेतमजूर महिलांनी अचानक रास्ता रोको आंदोलन सुरू केल्याने सुमारे अर्धा तास मोठ्या प्रमाणावर वाहतूक खोळंबली होती. त्यावेळी देवळा नगरपंचायतीचे नगरसेवक बाळासाहेब अहेर, बबन अहेर, सुनिल भामरे आदींनी मध्यस्थी करून महिलांची समजूत घातल्यानंतर वाहतूक सुरळीत सुरू झाली.मालेगाव, सटाणा, चांदवड तालुक्यातून तसेच देवळा तालुक्याच्या पूर्व भागात दुष्काळामुळे गावात काम मिळत नसल्यामुळे रोजगाराच्या शोधात हजारोंच्या संख्येने महिला व पुरुष मजूर उन्हाळी कांदे काढण्याच्या कामावर खाजगी वाहनाने देवळा (पश्चिम भागात) व कळवण तालुक्यात नियमितपणे येत असतात. कांदे काढणी व ते चाळीत साठवणुक करण्याच्या कामासाठी मजुरांना मोठी मागणी आहे. इतर तालुक्यातून येणाऱ्या हया मजुरांचा शेतकऱ्यांना मोठा आधार मिळाला आहे.देवळा पोलिसांनी मागील वर्षी दोन वेळा अवैध प्रवासी वाहतुक करतात म्हणून पिकअप, अॅपेरिक्षा आदी मजुरांनी भरलेली खासगी वाहने अडवून दंडात्मक कारवाई करण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा देखील मजुरांनी रास्ता रोको आंदोलन केले होते. अखेर गावातील नागरीकांनी मध्यस्थी करून समजूत काढल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले होते.गुरूवारी सकाळी साडेनऊ वाजता नासिक जिल्हा ग्रामीण वाहतुक शाखेच्या पोलिसांनी अनिधकृत प्रवासी वाहतुक केली म्हणून जळगाव चोंडी येथील शेतमजुरांची वाहतुक करणारे वाहन अडविले. दुष्काळामुळे होरपळून निघालेल्या संतप्त महीला मजुरांनी इतर वाहनातून येणार्या मजुरांशी संपर्क साधला व सर्वजण पाच कंदील परिसरात जमून त्यांनी रास्तारोको आंदोलन सुरू केले.देवळा शहरातील विंचूर प्रकाशा महामार्गावर त्यामुळे वाहतुकीची मोठ्या प्रमाणावर कोंडी होऊन वाहनधारकांची व पोलिसांची धावपळ झाली. यावेळी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून देवळा नगरपंचायतीचे नगरसेवक व नागरीकांनी पोलिस प्रशासन व मजूर महिलांमध्ये मध्यस्थी करून व महिलांची समजूत घालत त्यांना आंदोलनापासून परावृत्त केले त्यामुळे अर्धा तास ठप्प झालेली वाहतूक पुन्हा सुरळीत सुरू झाली.
महीला शेतमजुरांचा रस्त्यावर ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2019 5:43 PM
देवळा : येथील विंचूर प्रकाशा महामार्गावर जिल्हा ग्रामीण वाहतुक शाखेच्या पोलिसांनी गाडी अडवली म्हणून मालेगाव तालुक्यातील शेतमजूर महिलांनी अचानक रास्ता रोको आंदोलन सुरू केल्याने सुमारे अर्धा तास मोठ्या प्रमाणावर वाहतूक खोळंबली होती. त्यावेळी देवळा नगरपंचायतीचे नगरसेवक बाळासाहेब अहेर, बबन अहेर, सुनिल भामरे आदींनी मध्यस्थी करून महिलांची समजूत घातल्यानंतर वाहतूक सुरळीत सुरू झाली.
ठळक मुद्देदेवळा : अर्धा तास वाहतुक ठप्प; समजुती नंतर वाहतूक पूर्ववत