शहरं
Join us  
Trending Stories
1
वंचितने आपणच पाठिंबा दिलेल्या अपक्षाला दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
2
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
3
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
4
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
5
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
7
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
8
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
9
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
10
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
12
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
13
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
14
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
15
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
16
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
17
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
18
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
19
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
20
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान

महिलेवर हल्ला झाला, पण बिबट्या कोणी नाही पाहिला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2020 7:56 PM

बिबट्याने महिलेवर हल्ला केला तर लोकवस्तीत पुन्हा कोणालाही त्याचे दर्शन दिवसभरात घडले कसे नाही? असा प्रश्न कायम आहे.

ठळक मुद्देगल्लीबोळ पिंजून बिबट्याचा माग काढण्याचा प्रयत्न कोठेही बिबट्याचे दर्शन घडले नाहीजखमी महिलेने बिबट्या बघितला नसल्याचे सांगितले

नाशिक : कॉलेजरोडला लागून असलेल्या येवलेकर मळ्याच्या परिसरातील एका पेट्रोलपंपाजवळ शुक्रवारी (दि.२९) बिबट्याच्या मुक्त संचाराची वार्ता शहरभर पसरली. बिबट्याने महिलेला जखमी केल्याची चर्चा सुरू होते. काही वेळेतच वनविभाग, पोलीस प्रशासनाचा लवाजमा या भागात दाखल होतो अन् बिबट्याचा शोध सर्वत्र घेतला जातो; मात्र सुर्यास्तापर्यंत या भागात कोठेही बिबट्या आढळून आला नाही. महिलेवर हल्ला झाला, पण बिबट्या कोणी नाही पाहिला, असेच वास्तव दिवस मावळतीला गेला असता समोर आले.बीवायके महाविद्यालयाच्या पाठीमागील बाजूस बी-स्क्वेअर संकुलाच्या परिसरात बिबट्याचा संचार असल्याची वार्ता सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास शहरभर पसरली. यामुळे नाशिक पश्चिम वनविभागाचे वनक्षेत्रपाल विवेक भदाणे, वनपरिमंडळ अधिकारी मधुकर गोसावी हे रेस्क्यू पथकासोबत दाखल होतात. गंगापूर, सरकारवाडा पोलीस ठाण्यांचे पोलीसही वनविभागाला मदतीसाठी बंदोबस्ताकरिता तैनात केले जातात. कॉलेजरोड, विसेमळा, कृषीनगरकडून येणारी वाहतूक पर्यायी रस्त्याने वळविली जाते. या भागात ध्वनिक्षेपकावरून पोलीसांकडून उद्घोषणा करत नागरिकांना घराबाहेर न पडण्याच्या सुचना दिल्या जातात. लॉकडाउन सुरू असल्यामुळे बघ्यांची फारशी गर्दी या ठिकाणी जमली नाही, त्यामुळे बिबट्याच्या शोधकार्यात फारसा अडथळा वनविभागाला जाणवला नाही. सातपूर, गंगाम्हाळुंगी, अंजनेरी अशा चारही वनपरिमंडळातील अतिरिक्त कुमक घटनास्थळी वनविभागाकडून बोलविण्यात आली. इको-एको वन्यजीवप्रेमी संस्थेचे स्वयंसेवकांनाही पाचारण करण्यात आले. उपवनसंरक्षक शिवाजी फुले यांनीही घटनास्थळी दाखल होऊन रेस्क्यू पथकाला बिबटचा शोध घेण्याबाबत विविध सुचना दिल्या. सर्वच वनपाल, वनरक्षक, वन्यजीवप्रेमींनी या भागातील गल्लीबोळ पिंजून काढत बिबट्याचा माग काढण्याचा प्रयत्न केला; मात्र कोठेही बिबट्याचे दर्शन घडले नाही. त्यामुळे बिबट्याने महिलेवर हल्ला केला तर लोकवस्तीत पुन्हा कोणालाही त्याचे दर्शन दिवसभरात घडले कसे नाही? असा प्रश्न कायम आहे.

...अशा जखमी झाल्या धाराबाईयेथील एका बंगल्याच्या आवारात स्वच्छतेची कामे धारबाई रणबावळे या करीत होत्या. सकाळी नऊ वाजेच्या सुमारास त्यांच्या अंगावर काही तर पडले आणि त्या धक्क्याने धाराबाई झाडू मारताना जमिनीवर पडून जखमी झाल्या. यावेळी त्यांचे मनगट फ्रॅक्चर झााले. तसेच तोंडाला खरचटले आणि डोक्याला मुका मार लागला.महिलेच्या डोक्याला मुका मार लागला आहे; मात्र तो इतका गंभीर नाही आणि किरकोळ स्वरुपात तोंडाला खरचटल्याच्या जखमा आहे. जखमी महिलेने जबाबात बिबट्या बघितला नसल्याचे सांगितले. परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले तसेच ड्रोनद्वारेही शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र बिबट्याचा थांगपत्ता लागला नाही. बिबट्या आल्याबाबत संभ्रम कायम आहे. शहरात दिवसभर या घटनेनंतर विविध अफवांचे पीक आले.- विवेक भदाणे, वनक्षेत्रपाल, पश्चिम वनविभाग, नाशिक 

टॅग्स :Nashikनाशिकforest departmentवनविभागleopardबिबट्याwildlifeवन्यजीव