शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून बंडखोरांवर मोठी कारवाई, राज्यातील ४० नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
2
आजचे राशीभविष्य, ६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कन्येसाठी काळजीचा दिवस
3
सरकार 'या' कंपनीतील २.५ टक्के हिस्सा विकणार; ५०५ रुपये प्रति शेअर किंमत झाली निश्चित, जाणून घ्या
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: मुंबईत आज इंडिया आघाडीची पहिली सभा; राहुल गांधी संबोधित करणार
5
नेमक्या कोणत्या कारणांमुळे रश्मी शुक्लांची झाली उचलबांगडी? समोर आली अशी माहिती
6
मुंबईत आव्वाज कुणाचा? उत्तर आणि उत्तर पश्चिम मुंबईत चुरशीच्या लढती, महायुती, मविआमुळे काही मतदारसंघांचे गणित बदलणार
7
भाजपाच्या विदर्भातील बालेकिल्ल्यातच प्रतिष्ठेची लढत, परिवर्तनाच्या लाटेवर काँग्रेसची भिस्त
8
सत्तेत आल्यास मुलांनाही मोफत शिक्षण, उद्धव ठाकरे यांचे आश्वासन, कोल्हापुरातून प्रचाराचा फोडला नारळ
9
"मविआ म्हणजे विकासाचे मारेकरी", मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा घणाघात
10
सर्वच खासगी मालमत्ता जप्तीचा सरकारला अधिकार नाही, सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ न्यायाधीशांच्या खंडपीठाचा ७:२ बहुमताने निकाल
11
आता पोलिसांसह प्रत्येक सरकारी वाहनाचे चेकिंग, शरद पवारांच्या आरोपाची आयोगाकडून दखल
12
अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत कोणता मुद्दा यावेळी ठरणार निर्णायक?
13
पती-पत्नीला एकमेकांच्या हेरगिरीची परवानगी नाही, मद्रास व हिमाचल हायकोर्टाचे मत
14
'ऑलिम्पिक २०३६'च्या आयोजनास सज्ज, भारताने आयओसीकडे सोपविले आशय पत्र
15
'टीम इंडिया ऑस्ट्रेलियात ४-० ने जिंकणार नाही...', सुनील गावसकर यांचे धक्कादायक भाकीत
16
रणजी क्रिकेट: पृथ्वी शॉ याला मुंबईच्या संघात स्थान नाहीच, श्रेयसचं पुनरागमन
17
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
19
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
20
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य

महिला माहेरला मुकणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2017 12:32 AM

संपाचा परिणाम : बाहेरगावी जाण्याचे नियोजन रद्द नाशिक : राज्य परिवहन महामंडळाच्या चालक-वाहकांनी पुकारलेल्या बेमुदत संपाचा जनजीवनावर मोठा परिणाम झाला आहे. दिवाळी भाऊबीज सणासाठी माहेरी येणाºया आणि माहेरी जाणाºया गृहिणींच्या अडचणी वाढल्या असून, माहेरवाशिणींना ऐन दिवाळीत माहेरला मुकावे लागणार आहे. याशिवाय अनेकांनी सुटीत बाहेरगावी जाण्याचे नियोजन रद्द केले आहे.

संपाचा परिणाम : बाहेरगावी जाण्याचे नियोजन रद्द

नाशिक : राज्य परिवहन महामंडळाच्या चालक-वाहकांनी पुकारलेल्या बेमुदत संपाचा जनजीवनावर मोठा परिणाम झाला आहे. दिवाळी भाऊबीज सणासाठी माहेरी येणाºया आणि माहेरी जाणाºया गृहिणींच्या अडचणी वाढल्या असून, माहेरवाशिणींना ऐन दिवाळीत माहेरला मुकावे लागणार आहे. याशिवाय अनेकांनी सुटीत बाहेरगावी जाण्याचे नियोजन रद्द केले आहे.दिवाळी म्हटले की, सुट्यांचा काळ मानला जातो. या कालावधीत नागरिक सण साजरा करण्यासाठी मूळ गावी किंवा आप्तेष्टांकडे जातात. याशिवाय माहेरवाशिणीदेखील माहेरी जातात किंवा येतात. परंतु यंदा या सर्व नियोजनावर पाणी फेरले गेले आहे.सातवा वेतन आयोग लागू करावा, या प्रमुख मागणीसाठी एसटी चालक-वाहकांनी राज्यव्यापी बेमुदत संप पुकारला आहे. या संपामुळे दिवाळी सणासाठी आणि भाऊबीजेसाठी येणाºया-जाणाºया महिलांना या संपाचा फटका बसला आहे. लहान मुलांनाही शाळेला सुट्या लागल्याने त्यांना आप्तेष्टांकडे गावी जाता येत नसल्याने पालकांच्या अडचणी वाढल्या आहेत. तर दिवाळीनिमित्त चार-पाच दिवसांच्या सुटीत बाहेरगावी जाण्याचे नियोजनदेखील कोलमडले आहे. ऐन सणासुदीच्या काळात एसटी चालक-वाहकांनी पुकारलेल्या संपाबाबत जनसामान्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. चालक-वाहकांना वेतन वाढ मिळाली पाहिजे, याविषयी दुमत नाही मात्र त्यासाठी सामान्यांना वेठीस धरणे योग्य नसल्याची भावनादेखील व्यक्त केली जात आहे. या संपामुळे एकूणच जनजीवन विस्कळीत झाले आहे.महामंडळाच्या कार्यालयात धावदिवाळी सणासाठी बाहेरगावी जाऊ इच्छिणाºया नागरिकांनी एसटी बसचे आरक्षण करून ठेवले होते. या संपामुळे बाहेरगावी जाणे शक्य नसल्याचे समजताच केलेले आरक्षण रद्द करून आरक्षणाचे पैसे परत मिळावेत म्हणून महामंडळाच्या कार्यालयात धाव घेण्यास सुरु वात केली आहे. संप कधीही मिटला तरी इच्छितस्थळी वेळेवर पोहचता येणार नसल्याने बºयाच लोकांनी बाहेरगावी जाण्याचे नियोजन रद्द केले आहे.