शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
3
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
4
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
5
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
6
तिकडे डोनाल्ड ट्रम्प.. आणि इकडे नरेंद्र मोदी
7
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
8
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
9
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
10
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
11
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
12
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
13
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
14
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
15
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
16
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
17
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
18
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
19
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
20
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल

आरटीओच्या गोंधळाचा महिलेला मनस्ताप

By admin | Published: September 06, 2014 11:06 PM

आरटीओच्या गोंधळाचा महिलेला मनस्ताप

नाशिक : दुचाकी वाहन खरेदी करून वर्षभराचा कालावधी लोटल्यानंतरही वाहनाचे आरसी बुक तर मिळाले नाहीच शिवाय चौकशीकामी आरटीओ कार्यालयात गेलेल्या महिलेला धक्काबुक्की करून अपमानास्पद वागणूक दिल्याचा प्रकार काही महिन्यांपूर्वी घडला. आरटीओच्या सावळ्या गोंधळामुळे महिलेला मनस्ताप सहन करावा लागला असून, या प्रकारानंतर पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज केल्यानंतरही दखल घेतली नसल्याने संबंधित महिलेने पोलीस आयुक्तांकडे तक्रार अर्ज केला आहे. देवळाली कॅम्प येथील अंजली संतोष महाले या महिलेने जून २०१३ मध्ये हीरो होंडा कंपनीची प्लेझर गाडी खरेदी केली. या दुचाकीचे रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आरसी बुक तुमच्या पत्त्यावर येईल, असे सांगण्यात आले. परंतु दोन-तीन महिन्यांनंतर आरसी बुक न आल्याने महाले यांनी आरटीओत संपर्क साधला असता पत्ता चुकीचा टाकला गेला असे सांगून अर्ज मागितला व त्यावर सुदाम सूर्यवंशी या अधिकाऱ्याची स्वाक्षरी घेण्यास सांगितले. स्वाक्षरीसाठी सूर्यवंशी यांनी दिवसभर थांबून दुपारी सही केली व पत्ता बदललेला असल्याने ४५० रुपये भरावे लागेल व राहण्याच्या पत्त्याचा पुरावा जोडावा लागेल, असे सांगितले. त्यानंतर जानेवारी २०१४ ला पुन्हा अर्ज करून रहिवासी पुरावा म्हणून आधार कार्डची नक्कल कॉपी दिली व स्मार्ट कार्ड घरपोच येईल, असे सांगितले. मात्र स्मार्ट कार्ड न मिळाल्याने पुन्हा कार्यालयात चौकशी केली परंतु मिळाले नाही. त्यानंतर काही दिवसांनी आरटीओत चौकशी केली असता पुन्हा अर्ज करून ४५० रुपये भरण्यास सांगितले. त्यानुसार पुन्हा अर्ज करून रक्कम भरल्यावर खिडकी क्रमांक ४३ वर असलेल्या कर्मचाऱ्याने तुमचा पत्ता निफाडचा झाला आहे तो सुधारावा लागेल, असे सांगून साहेबांची स्वाक्षरी आणण्यास सांगितले. त्यानंतर सूर्यवंशी यांच्याकडे जाऊन दोनवेळा पैसे भरल्याचे सांगताच त्यांनी हातातील कागद हिसकावून आम्हाला तेच काम आहे का असे सांगून कार्यालयातून हात धरून बाहेर काढले. (वार्ताहर)