नाशिक : शहरात पादचारी महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी, मंगळसूत्र लंपास करण्याच्या घटना अद्याप घडत होत्या; मात्र दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या महिलांचेही दागिने धोक्यात आल्याचे विनयनगर परिसरात घडलेल्या घटनेवरून सिद्ध झाले आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहित अशी, विनयनगर परिसरातून एका मंदिरासमोरून दुचाकीने जात असलेल्या पल्लवी पराग जुन्नरे (३६, कर्मयोगीनगर, मुंबई नाका) या स्कुटी दुचाकीने प्रवास करत असताना पाठीमागून पल्सर दुचाकीवरून आलेल्या दोघा भामट्यांनी त्यांच्या गळ्यातील अडीच तोळ्याचे मंगळसूत्र, एक तोळ्याची सोनसाखळी ओरबाडून पळ काढला. जुन्नरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुंबईनाका पोलीस ठाण्यात सोनसाखळी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळसूत्र व सोनसाखळी मिळून सुमारे ६३ हजारांचा ऐवज चोरट्यांनी हातोहात लंपास केल्याचे फिर्यादित म्हटले आहे.पाठीमागून पल्सरवरून आलेल्या दोघा चोरट्यांपैकी पाठीमागे बसलेल्या चोरट्याने जुन्नरे यांच्या गळ्यातील दागिने हिसकावले यावेळी त्यांना हिसका बसला. सुदैवाने त्यांनी तोल सावरल्यामुळे त्यांचा अपघात झाला नाही. पोलिसांकडून शहरासह रिंगरोडवरही नाकाबंदी केली जात असूनही सोनसाखळी चोरीच्या घटना सातत्याने घडत असल्यामुळे महिलावर्गात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंदा वाघ यांनी घटनास्थळी धाव घेत नाकाबंदीच्या सूचना दिल्या; मात्र चोरटे पळून जाण्यास यशस्वी ठरले. महिलेची चेन ओरबडलीविजय-ममता समोर असलेल्या ट्युपिल ड्रीम फ्लॉवर येथे राहाणाऱ्या अस्मिता उमेश पारखे (वय ५०) या मंगळवारी सायंकाळी ६ वाजेच्या दरम्यान टाकळीरोड येथुन पायी जात होत्या. पोतदार शाळेजवळ पाठीमागुन एका दुचाकीवर आलेल्या अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील ३० हजार रुपये किमतीची सोन्याची पोत ओढुन चोरून नेली.
महिलेचे दागिने ओरबाडले
By admin | Published: November 04, 2016 12:55 AM