नाशिक : जूना गंगापूर नाका येथे येथील सिग्नल ओलांडून अशोकस्तंभाकडे जाण्यासाठी रीक्षाची प्रतीक्षा करीत असलेल्या एका महिलेचा चारचाकीतून आलेलेल्या एका इसमाने लिफ्ट देण्याच्या बहाण्याने विनयभंग केल्याची घटना घडली. घटनेतील पिडित महिलेने गंगापूररोड परिसरातील राठी अमराई परिसरातील प्रफुल्ल गुलाब तांबोळी या संशयित अरोपी विरोधात सरकारवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पिडित महिला जूना गंगापूर नाका येथे अशोकस्तंभाच्या दिशेने जाण्यासाठी रीक्षाची प्रतिक्षा करीत असताना प्रफुल तांबोळी याने चारचाकी गाडीतून येऊन पिडित महिलेला गाडीतून सोडते असे सांगत गाडीत बसविले. महिला गाडीत बसल्यानंतर तिचा हात धरून तिचा विनयभंग केला. महिलेने प्रतिकार केला असता या घटनेविषयी कोणालाही सांगू नको. अन्यथा तुला मारून टाकीन अशी धमकीही दिल. याप्रकरणी पिडितेने सरकारवाडा पोलीस ठाण्यात तांबोळीविरोधात दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिक शहरात महिलांच्या विनयभंगाच्या घटनांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढ होत असून पोलीसांचा रोड रोमिओ आणि टवाळखोरावरील वचक कमी झाल्याने साततत्याने महिला, मुली, महाविद्यासलयीन तरुणींच्या विनयभंगाचे व छेडछाडीचे प्रकार समोर येत आहे. त्यामुळे शहरातील चौकाचौकात कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यासोबतच टवाळखोरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नाशिककरांकडून होत आहे.
लिफ्ट देण्याच्या बहाण्याने महिलेचा विनयभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2020 4:30 PM
अशोकस्तंभाकडे जाण्यासाठी रीक्षाची प्रतीक्षा करीत असलेल्या एका महिलेचा चारचाकीतून आलेलेल्या एका इसमाने लिफ्ट देण्याच्या बहाण्याने विनयभंग केल्याची घटना घडली.
ठळक मुद्देमहिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर जूना गंगापूर नाका येथे महिलेचा विनयभंग रीक्षाच्या प्रतिक्षेतील महिलेसोबत गैरवर्तन