घोटी : ग्रामपालिका आयोजित ४८ व्या डांगी, संकरित, औद्योगिक, संकरित आणि शेतकी जनावरांच्या प्रदर्शनाच्या समारोपप्रसंगी सोमवारी लालमातीवरील कुस्ती स्पर्धा घेण्यात आल्या. यात नाशिक जिल्ह्यासह लगतच्या जिल्ह्यातील मल्लांनी सहभाग घेतला. या कुस्त्याच्या आखाड्यात प्रथमच महिलांच्या कुस्त्या खेळवण्यात आल्या. घोटीकरांना पहिल्यांदाच महिला व मुलीची कुस्ती पाहण्याची संधी लाभली. कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन ज्येष्ठ मल्ल तथा नगरसेवक शिवाजी चुंबळे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव होते. यावेळी दादा मांडे, विठ्ठल लंगडे, ज्ञानेश्वर लहाने, किसन काळे, भगवान आडोळे, रामदास भोर, रघुनाथ तोकडे, संतोष दगडे, विनोद भागडे, संजय आरोटे, सोमनाथ घारे, रामदास शेलार, धीरज गौड, संजय सोनकांबळे आदी मान्यवर उपस्थित होते. दरम्यान लालमातीच्या कुस्तीत इगतपुरी तालुक्याच्या इतिहासात प्रथमच महिलांनी कुस्ती स्पर्धेत भाग घेत खेळ सादर केला.
महिलांच्या कुस्तीने वाढली उत्सुकता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2018 11:51 PM