मालेगाव : समाजाने दखल घेतल्यास तरु णाईला प्रोत्साहन मिळेल. आज महिला पुरु षापेक्षा कुठेही कमी नाहीत, किंबहुना कांकणभर सरसच आहेत, याची प्रचिती वडेलच्या तरुणींनी दाखवुन दिली आहे, असे प्रतिपादन दामिनी महिला सुरक्षा पथकाच्या प्रमुख पोलीस उपनिरीक्षक पूनम राऊत यांनी केले. तालुक्यातील अजंग जवळ घडलेल्या दुर्दैवी अपघातात निकीता सोनवणे, गायत्री मांडवडे, सपना पगारे यांनी आपला जीव धोक्यात घालून अनेक महिलांचे प्राण वाचवले त्यासाठी श्री संत गाडगेबाबा प्रतिष्ठान मालेगावच्या वतीने या तिघींना प्रेरणा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सन्मानपत्र, रोख रक्कम व पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. कॅम्प सार्वजनिक वाचनालयात झालेल्या या कार्यक्र मात प्रा.शुभदा कुलकर्णी अध्यक्षस्थानी होत्या. पूनम राऊत म्हणाल्या, समाजातील प्रत्येक घटकाने या तिघींचा आदर्श घेत निस्पृहपणे काम केले पाहिजे. त्यांच्या या कार्याची शासनाने दखल घ्यावी. प्र्रमुख पाहुणे म्हणून शामकांत पाटील व रमेश उचित उपस्थित होते. पुरस्कारार्थींच्यावतीने निकीता सोनवणे हिने मनोगत व्यक्त केले. यावेळी रविराज सोनार, रामदास बोरसे, आनंद शेलार, महेंद्र पगार,भास्कर तिवारी आदींनी मनोगत व्यक्त केले. प्रतिष्ठानचे अध्यक्ष जगदिश वैष्णव यांनी प्रास्ताविक केले. अतुल महाले यांनी सुत्रसंचलन केले. निशांत मानकर यांनी आभार मानले. याप्रसंगी अशोक वेताळ, वैदेही भगिरथ, डॉ.सुरेश शास्त्री, राजेंद्र भामरे, सविता वैष्णव, चंद्रकांत चौधरी, भुषण सोनवणे, शैलेश परदेशी, प्रेम ब्राहीकर, जयपाल पवार, संजय मिटकरी, राजेंद्र ठाकुर, नाना अहिरे, प्रकाश पानपाटील, अभय शर्मा, रामेश्वर तारे, जगदिश जहागिरदार, स्वप्निल वाघ, विवेक वैष्णव, निलेश पाटील, आदी उपस्थित होते.
पुरूषांपेक्षा महिला काकणभर सरसच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2017 6:25 PM