परिचय महिला संस्थांचाटाटा इन्स्टिट्यूट आॅफ सोशल सायन्स, सर्वोच्च न्यायालय आणि महाराष्टÑ पोलीस यांच्या वतीने महिला व लहान मुलांसाठी कल्याणकारी संस्था म्हणून महिला व मुले सहाय्यता कक्ष महाराष्टÑात गेल्या ३० वर्षांपासून कार्यरत आहे. या संस्थेअंतर्गत नाशिकमध्ये ८ मार्च २००३ साली नाशिकसाठी महिला सहाय्यता कक्षाच्या कामास प्रारंभ झाला. आजवर या संस्थेकडे कौटुंबिक हिंसाचार, महिलांवरील अत्याचार, घटस्फोट खटले, लहान मुलांवरील अत्याचार, मानसिक ताणतणावाच्या घटना आदी विविध प्रकारच्या केसेस आले होते व त्यांचे निराकरण करून त्यांना निरनिराळ्या स्तरावर मार्गदर्शन करण्यात आले. महिलांचा वावर ज्या ज्या क्षेत्रात आहे, त्या सर्व ठिकाणी महिलांना निर्भयपणे कामकाज करता यावे यासाठी आवश्यक गोष्टी (समुपदेशन, मार्गदर्शन, कायदेशीर बाबी) या संस्थेतर्फे केल्या जातात. या संस्थेतर्फे विवाहपूर्व, विवाहपश्चात सुमपदेशन, लिव्ह इन जोडप्यांच्या समस्या, कौटुंबिक कलह आदी समस्यांवर समुपदेशन केले जाते. अशा घटनांमुळे असहाय्य झालेल्या महिलांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी मदत करण्याचा प्रयत्न या संस्थेतर्फे केला जातो. त्यांना नोकरी, व्यवसाय शोधण्यास मदत केली जाते.पूर्वी चूल आणि मूल या चौकटीतच असणारी महिला आता शिकून नोकरी-व्यवसायासाठी घराबाहेर पडू लागली आहे. पण असे असूनही घरच्या जबाबदाºयांचा भारही तिच्यावरच येतो. त्यातून कौटुंबिक कलह तयार होतात. अशा केसेसमध्ये पत्नी-पत्नीबरोबरच त्यांच्या कुटुंबीयांनाही समोरासमोर बसवून मार्गदर्शन केले जाते. त्यांचे समुपदेशन केले जाते. संस्थेतर्फे महिला जनजागृतीच्या निरनिराळ्या कार्यशाळा घेतल्या जातात. याशिवाय उशिरा लग्न्न केल्यामुळे येणाºया अडचणी, लिव्ह इनमधील फसवणूकीच्या केसेसही मोठ्या प्रमाणात कक्षाकडे येत आहेत. त्यांनाही मार्गदर्शन करण्याचे काम सुरू असते. संस्थेचे कार्यकर्ते ठिकठिकाणी जाऊन कार्यशाळांमध्ये मार्गदर्शनही करतात. सध्या महिला सहाय्यता कक्षात कविता निकम, गीता गायकवाड, दीपाली मानकर आदी कार्यरत आहेत.
कौटुंबिक आरोग्यासाठी कार्यरत महिला-मुले सहाय्यता कक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2017 12:50 AM