नाशिक : महिलांनी स्वत:मधील अंतर्गत गुण ओळखून आपल्या आवडीच्या क्षेत्रात प्रावीण्य मिळवायला हवे. त्यासाठी दुसºयावर अवलंबून न राहता स्वत:ची निर्णयक्षमता वाढविण्याची गरज असल्याचे प्रतिपादन एसएमआरके महाविद्यालयातील समाजशास्त्र विभागप्रमुख प्रा. सिंधू काकड यांनी केले. महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्स, इंडस्ट्री अॅण्ड अॅग्रिकल्चर, महिला उद्योजकता उपसमिती, अखिल भारतीय कच्छ कडवा पाटीदार सनातन महिला मंडळ सिन्नर, अखिल भारतीय कच्छ कडवा पाटीदार युवा संघ अहमदनगर व नाशिक यांच्यातर्फे संयुक्तरीत्या जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रांत भरीव योगदान देणाºया यशस्वी महिलांचा प्रेरणापूर्ती नारी शक्ती पुरस्काराने सन्मान करण्यात आला. महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्सच्या बाबूभाई राठी सभागृहात शुक्रवारी (दि. ९) आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात त्या बोलत होत्या. व्यासपीठावर महाराष्ट्र चेंबरच्या महिला उपसमितीच्या अध्यक्ष सोनल दगडे, एसएमआरके महिला महाविद्यालयाच्या प्रा. सिंधू काकड, दया पटेल, सीमा पवार, कोमल गुप्ता, मदन लोणारे, मध्य महाराष्ट्र विभागाचे अध्यक्ष रमेश पटेल, विभागीय प्रमुख नरेंद्र साखला, कौन्सिल अध्यक्ष कांतीभाई पटेल, युवा संघाचे माजी अध्यक्ष मावजी पटेल उपस्थित होते. यावेळी नवीन उद्योग सुरू करण्याची इच्छा बाळगणाºया अथवा सुरू असलेला उद्योग वाढवण्याची इच्छा बाळगणाºया महिलांसाठी आयोजित कार्यक्र मात व्यवसायाचे विविध पर्याय, विविध संधी व त्यासाठी लागणाºया नोंदणी प्रक्रि या, कायदेशीर बाबी, त्याची पूर्तता, शासकीय योजना, व्यवसाय करताना किंवा सुरू करताना येणाºया अडचणी, गृहिणींकरिता घरबसल्या करता येणारे व्यवसाय इत्यादी विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. प्रास्ताविक सोनल दगडे यांनी, तर सूत्रसंचालन नरेंद्र साखला यांनी केले. मिथिला कापडणीस यांनी आभार मानले.
महिलांनी निर्णयक्षमता वाढविण्याची गरज सिंधू काकड : ‘प्रेरणापूर्ती नारी शक्ती’ पुरस्कार प्रदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 1:06 AM
नाशिक : महिलांनी आवडीच्या क्षेत्रात प्रावीण्य मिळवायला हवे असल्याचे प्रतिपादन एसएमआरके महाविद्यालयातील समाजशास्त्र विभागप्रमुख प्रा. सिंधू काकड यांनी केले.
ठळक मुद्देनारी शक्ती पुरस्काराने सन्मान घरबसल्या करता येणारे व्यवसाय विषयांवर मार्गदर्शन