नाशिक : राज्य मार्ग परिवहन महामंहळाने २०१९मध्ये चालक आणि वाहक या पदांसाठी स्वतंत्र उमेदवारांकडून अर्ज न मागविता चालक कम वाहक असे अर्ज मागविले होते. त्यामध्ये महिलांचेही चालक आणि वाहक अशा दोन्ही पदांसाठी अर्ज घेण्यात आले. त्यानुसार पात्र ठरलेल्या महिला चालकांचे प्रशिक्षण औरंगाबाद येथील मुख्य प्रशिक्षण केंद्रात सुरू झाले होते. परंतु कोरोनामुळे वर्षभर बंद असलेले प्रशिक्षण पुन्हा सुरू केले जात आहे. त्यामुळे आता पुढील वर्षी नाशिक विभागीय मंडळाला महिला चालक मिळणार आहेत.
नाशिक विाभागातून अर्ज केलेल्या पात्र उमेदवारांपैकी १० महिला कर्मचाऱ्यांचे चालक आणि वाहक पदाचे प्रशिक्षण औरंगाबाद येथे सुरू करण्यात आले होते. मात्र, काेरोनामुळे अल्पावधीच प्रशिक्षण अर्ध्यावर बंद करण्यात आल्यामुळे २०२१मध्येही या महिला प्रशिक्षणार्थींना सेवेत येता आलेले नाही. प्रशिक्षण बंद करण्यात आल्यामुळे पुन्हा कधी प्रशिक्षण सुरू होते, याची प्रशिक्षणार्थींना प्रतीक्षा होती. आता मुख्य कार्यालयाने याबाबतचे आदेश काढल्यामुळे महिला चालक, वाहकांचे प्रशिक्षण पूर्ण होऊ शकणार आहे. हे प्रशिक्षण पुढील वर्षभर सुरू राहाणार असल्याचे समजते. मात्र, प्रशिक्षण शक्य तितक्या लवकर पूर्ण करण्याबाबतचा विचारविनीमय सुरू असल्याचेही बोलले जात आहे.
नाशिक विभागात सध्या ४५०पेक्षा अधिक महिला वाहक आहेत. त्यात आणखी भर पडणार आहे. मात्र, चालक नसल्याने या प्रशिक्षणातू महिला चालकांची कमतरता भरून निघणार होती. आता नाशिकला यासाठी काहीवेळ प्रतीक्षा कारावी लागणार आहे.
--इन्फो--
१३
जिल्ह्यातील आगार
२१००
बसचालक
१९००
बसवाहक
४५०
महिला बसवाहक
--इन्फो--
विभागातून १० चालकांची निवड
नाशिक विाभागातून दहा महिलांची चालक वाहक पदासाठी नवड करण्यात आली आहे. त्यानुसार या महिला चालकांचे प्रशिक्षण औरंगाबाद येथील केंद्रात सुरू करण्यात आले आहे. नाशिक आणि औरंगाबाद अशा दोन्ही डिव्हीजनचे प्रशिक्षण हे औरंगाबादमध्ये चालते. त्यामुळे नाशिकचे प्रशिक्षणार्थीही औरंबादालाच प्रशिक्षण घेतात. नाशिकमध्ये अद्याप एकही महिला चालक नाही. मात्र, जवळपास ४५० वाहक आहेत. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर या महिला कर्मचाऱ्यांच्या संख्येत वाढ होणार आहे.
--इन्फो--
गेल्या ऑगस्ट महिन्यांपासून बंद करण्यात आलेले कर्मचारी प्रशिक्षण पुन्हा सुरू केले जात आहे. त्यामुळे महामंडळाच्या सेवेत पुढील वर्षी आणखी काही कर्मचाऱ्यांची भर पडणार आहे. सध्या औरंगाबाद येथे ३२ कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण सुरू आहे. यातील १० नाशिक विभागाचे, तर उर्वरित औरंगाबाद विाभागील सेवेत रूजू होतील. महामंडळातील ५० वर्षे वयावरील कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृत्ती दिली जाणार असल्याने अनेक पदे रिक्त होणार आहेत.
--इन्फो--
महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी अट शिथील
एस. टी. महामंडळात महिलांसाठी राखीव जागा ठेवण्यात आल्या आहेत. पुरुष व महिलांसाठी अवजड वाहन परवाना व तीन वर्षे वाहन चालवण्याचा अनुभव, अशी अट यापूर्वी होती. आता महिलांसाठी अवजडऐवजी हलकी वाहने चालवण्याचा एक वर्षांचा परवाना अशी अट ठेवण्यात आली. त्यामुळे महिलांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. अवजड वाहन चालवण्याचा अनुभव नसल्याने त्यांना नियमानुसार एक वर्षाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. या महिलांच्या हाती स्टेअरिंग देताना अगोदर कमी अंतरावरील मार्गावर पाठविले जाईल. या अनुभवानंतर त्यांना लांब पल्ल्याचीही ड्युटी दिली जाणार आहे. अर्थात त्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेतली जाणार आहे.