पेठ तालुक्यात महिला बचत गटांच्या माध्यमातून विविध प्रकारच्या वस्तू व खाद्यपदार्थांचे उत्पादन करण्यात येत आहे. यामध्ये बांबूपासून शोभेच्या वस्तू, बांबूचे लोणचे, करवंद लोणचे, आंबा लोणचे, मशरूम, निरगुडी तेल, तरवटा चहा, हातसडीचा तांदूळ, नागली पीठ, भुजा, चटणी अशी विविध उत्पादने केली जात असून, उत्पादित मालाला बाजारपेठ उपलब्ध व्हावी, यासाठी पेठ पंचायत समिती आवारात असलेले गाळे महिला बचतगटांना मिळावेत, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.
याप्रसंगी सुनंदा भुसारे, रेणुका बोसारे, भारती चव्हाण, सुगंधा वातास, सुनीता कावेर यांचे सह महिला बचत गटाच्या प्रतिनिधी उपस्थित होत्या.
फोटो - २९ पेठ १
विधानसभा हंगामी अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना निवेदन देताना, सुनंदा भूसारे, रेणुका बोसारे, भारती चव्हाण, सुगंधा वातास, सुनीता कावेर आदी.
===Photopath===
290321\29nsk_7_29032021_13.jpg
===Caption===
विधानसभा हंगामी अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना निवेदन देतांना सुनंदा भूसारे, रेणूका बोसारे, भारती चव्हाण, सुगंधा वातास, सुनिता कावेर आदी.