नाशिकरोड : जोखमीच्या कामांसह आज सर्वच क्षेत्रांत महिला आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटवीत आहेत. मात्र नोकरी, व्यवसायासह कौटुंबिक अशी दुहेरी जबाबदारी सांभाळतांना महिलांनी आरोग्याबाबत अधिक जागरूक राहावे, असे आवाहन डॉ. प्रणिता संघवी-बोरा यांनी व्यक्त केले.महावितरणच्या परिमंडळ कार्यालयात महिलांच्या आरोग्याविषयी आयोजित चर्चासत्रात डॉ. प्रणिता संघवी-बोरा यांनी केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मुख्य अभियंता ब्रिजपालसिंह जनवीर, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी विश्वास पाटील, कार्यकारी अभियंता प्रेरणा बनकर आदी उपस्थित होते.यावेळी डॉ. संघवी-बोरा म्हणाल्या की, स्पर्धेच्या युगात नोकरी, व्यवसाय करताना महिलांना स्वत:च्या कुटुंबालाही वेळ द्यावा लागतो. ही दुहेरी जबाबदारी सांभाळतांना अनेकदा आरोग्याकडे दुर्लक्ष होते, पण महिलांनी आपली दुहेरी जबाबदारी सांभाळतांना अधिक सजग राहून आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले. महिलांना आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी यासंदर्भात प्रोजेक्टरद्वारे सविस्तर मार्गदर्शन केले.यावेळी प्रणाली विश्लेषक बबिता तडवी, उप-व्यवस्थापक माधुरी कुलकर्णी, सुधा बाजपेयी, संगीता गजभिये, योगीता तुंगार, मनीषा कुलकर्णी, शालिनी भरसाखर, मनीषा भडकस, शशिकला जाधव आदी उपस्थित होत्या.
महिलांनी आरोग्यासंबंधी जागरूक राहावे : बोरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2019 12:32 AM