नांदूरवैद्य-: महिलांनी भारतीय संस्कृती जोपासावी असे सांगत मुलीच्या संसारात आईचा हस्तक्षेप वाढल्याने कौटुंबिक वादांमध्ये वाढ झाल्याचे प्रतिपादन अपर्णा रामतिर्थकर यांनी केले. इगतपुरी तालुक्यातील नांदूरवैद्य येथे समाजप्रबोधनपर व्याख्यानात त्या बोलत होत्या. कार्यक्र माची सुरूवात पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करून करण्यात आली करण्यात. यावेळी रामतिर्थकर म्हणाल्या, आई आपल्या मुलीवर संस्कार करण्यासाठी कमी पडत आहेÞ त्यामुळे आज कुटुंबव्यवस्थाच ढासळत चालली आहेÞ सध्या मुलीच्या संसारात आईचा हस्तक्षेप वाढल्याने किरकोळ कारणावरून कौटुंबिक वाद निर्माण होत आहेतÞ म्हणून केवळ सासूलाच दोष देणे चुकीचे आहेÞ. परदेशी शिक्षण पद्धतीतून आधुनिकतेकडे जाताना आपण आपल्या परंपरा आणि संस्कार विसरत चाललो आहोतÞ, यामुळे घरातील महिलांचे आईपण हरवलेले दिसतेÞ संसार आणि शिक्षण यांचा समन्वय अतिशय आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
महिलांनी भारतीय संस्कृती जोपासावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2019 5:47 PM