पिंपळगाव बसवंत : आयुष्य खूप सुंदर आहे, महिलांसारखे सुंदर शरीर कुणाकडेही नाही. त्यामुळे शरीराची काळजी घेत महिलांनी स्वत:वर प्रेम करा, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या गौरी सावंत यांनी केले. पिंपळगाव बसवंत येथे महिला आधार संस्था व नॅशनल अॅग्रो फार्मर्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित सन्मान स्त्रीशक्तीचा या कार्यक्रमप्रसंगी अध्यक्ष म्हणून सावंत बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., चंदुलाल शहा, निफाड तहसीलदार शिवकुमार आवळकंठी, सरपंच अलका बनकर, महाविद्यालयाच्या प्राचार्य एस. एस. घुमरे, ग्रामविकास अधिकारी लिंगराज जंगम, राष्ट्रीय खेळाडू तेजस्विनी गाडे, कवी विष्णू थोरे, निबलाल मुझावर, रंजना मोरे, सतीश मोरे, गणेश बनकर, उपसरपंच संजय मोरे, देवा काजळे, दिलीप मोरे आदी उपस्थित होते. पुढे बोलताना गौरी सावंत म्हणाल्या की, प्रत्येक विद्यार्थ्याला लाकूडतोड्याची गोष्ट अवगत आहे परंतु त्याचबरोबर विद्यार्थ्यांना लैंगिक शिक्षणासह तृतीय पंथी म्हणजे काय हेदेखील माहिती होणे गरजेचे असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.यावेळी यशश्री निकम, ज्ञानोबा ढगे, भारती मोरे, मनोज दिघे, विशाल यादव, शेखर मोरे आदी उपस्थित होते. दीपक मोरे यांनी आभार मानले.
महिलांनी स्वत:वर प्रेम करावे गौरी सावंत : पिंपळगाव बसवंतला सन्मान स्त्रीशक्तीचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2018 12:10 AM